आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • New BJP Ad Attacks Arvind Kejriwal Over 'Gotra' Or Caste

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्ली निवडणूक : भाजप-केजरीवाल यांच्यात 'उपद्रवी गोत्रा'वरून जुंपली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत मतदानाला पाच दिवस शिल्लक असताना राजकीय वातावरण प्रचंड तापले असून सोमवारी भाजपने एका जाहिरातीमध्ये आम आदमी पार्टीचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल यांना उपद्रवी गोत्र संबोधल्याने प्रचंड गोंधळ माजला आहे. केजरीवाल यांनी हा प्रकार समस्त अग्रवाल समाजाचा अपमान असल्याचे सांगत वाद अधिकच चिघळवला. याबद्दल दोन्ही पक्षांनी निवडणूक आयोगाकडे परस्परांविरुद्ध जातीयवादी राजकारण करीत असल्याच्या तक्रारी दाखल केल्या आहेत.

भाजपच्या या जाहिरातीबद्दल केजरीवाल म्हणाले, "गेल्या काही दिवसांपासून भाजपवाले जाहिरातींमधून माझ्यावर वैयक्तिक हल्ले करत आहे. त्यांनी माझ्या कुटुंबीयांनाही लक्ष्य केले. तरी मी गप्प राहिलो. कारण, अण्णांनी सांगितले होते की जर कुणी तुम्हाला मुद्दाम लक्ष्य करत असेल तर ते सहन करण्याची शक्ती आपल्यात असायला हवी. आता सहन कसे करणार? भाजपने समस्त अग्रवाल समाजालाच आता उपद्रवी ठरवले आहे.'

दरम्यान, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन यावर खुलासा केला. ते म्हणाले, "आपच्या डीएनएमध्येच अराकजकता आहे. कायम खोटारडेपणाचे राजकारण हा पक्ष करतो. केजरीवाल आता जातीय मुद्दा उपस्थित करून लाभ घेऊ पाहत आहेत. त्यांचे हे राजकारण राष्ट्रविरोधीच आहे. मुळात उपद्रवी हा शब्द आपच्या विचारप्रणालीबद्दल वापरण्यात आला आहे. मात्र, ते विनाकारण मुद्दा तापवत आहेत.'

जाहिरातीमध्ये आहे काय?
गेल्या वर्षी प्रजासत्ताकदिनी निदर्शने करून दिल्लीतील संचलनात बाधा आणण्याचा इशारा केजरीवाल यांनी दिला होता. या वर्षी त्यांना या संचलनासाठी निमंत्रित करण्यात आले नाही. याबद्दलही त्यांनी तक्रारीचा सूर लावला. या संदर्भाने जाहिरातीमध्ये नमूद असलेला मजकूर असा : "देशातील कोट्यवधी लोक प्रजासत्ताक दिन म्हणजे एक राष्ट्रीय पर्व मानते. याबद्दल जनतेला गर्वही आहे. आपले आपल्या उपद्रवी गोत्राची मात्र यात बाधा आणण्याची तयारी होती.'

"आप'च्या निधीबद्दल "अवाम'ला शंका
"आप'ला चार बोगस कंपन्यांकडून प्रत्येकी ५० लाख रुपयांचा निधी मिळाला असल्याचा गंभीर आरोप अवाम या संघटनेने केला आहे. निधी देणार्‍या इतर ११ कंपन्यांचे संचालक पडक्या घरात राहतात. कंपन्यांचे पत्तेही झोपडपट्टीतील आहेत. या कंपन्यांची कमाई काहीच नसताना ५० लाख रुपये निधी त्या कशा देऊ शकतात?, असा प्रश्न अवामने उपस्थित केला आहे.

पुढे वाचा, केजरीवाल यांना हायकोर्टाची नोटीस...