आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटानंतर दाऊद इब्राहिमचा पहिला पूर्ण फोटो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दाऊदचा हा फोटो काही वर्षांपूर्वी कराचीहून एका पत्रकाराने मिळविला होता. - Divya Marathi
दाऊदचा हा फोटो काही वर्षांपूर्वी कराचीहून एका पत्रकाराने मिळविला होता.
नवी दिल्ली /कराची - कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा नवा फोटो समोर आला आहे. त्यात तो काळा कोट आणि पठाणी वेषात दिसत आहे. 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटानंतरचा त्याचा हा पहिला असा फोटो आहे ज्यात तो पूर्ण दिसतो. काही वर्षांपूर्वी एका भारतीय पत्रकाराने कराचीमधून हा फोटो मिळविला होता. याआधी गेल्यावर्षी ही एक फोटो समोर आला होता, ज्यात दाऊद क्लिन शेव्ह केलेला दिसला होता.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, आता दाऊद 60 वर्षांचा झाला असून या फोटोत तो फार तरुण दिसत आहे. पाकिस्तानातील या फोटो त्याचा वेषही पाकिस्तानींसारखा दिसतो.
- यात तो क्लिन शेव्ह केलेला दिसतो. त्याने मिशीही ठेवलेली नाही.
- फोटोवरुन तरी त्याने प्लास्टिक सर्जरी किंवा तत्सम उपाय केल्याचे दिसत नाही.
- पत्रकार विवेक अग्रवाल यांनी त्यांच्या पुस्तकासाठी कराचीमधून हा फोटो मिळविला होता.
- अशीही चर्चा होती, की दाऊदने त्याच्या चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी करुन घेतली आहे, त्यामुळे त्याचा चेहरा बदलला आहे.

गेल्यावर्षी 'रॉ'ला मिळाला होता एक फोटो
- भारताची गुप्तचर संस्था रॉ ला गेल्यावर्षी 22 ऑगस्टला दाऊदचा एक फोटो मिळाला होता.
- फोटोसोबतच त्याच्या पाकिस्तानी पासपोर्टची एक प्रतही भारताची गुप्तचर संस्था रिसर्च अँड अॅनॅलिसिस विंग (RAW) ने मिळविली होती.
- हे दस्तऐवज भारताने दाऊदविरोधातील पुरावे म्हणून पाकिस्तानला सोपवले होते.
- दाऊदला दोन पासपोर्ट कराचीतून आणि दोन रावळपिंडीतून देण्यात आले होते.
- एका टीव्ही चॅनलने दावा केला होता, की कराचीच्या क्लिफ्टन भागात दाऊदने एक बंगला खरेदी केला आहे.
- हा बंगला येथील प्रसिद्ध जियाऊद्दीन हॉस्पिटलजवळ आहे.
- त्यावेळी अशीही माहिती समोर आली होती, की दाऊद आणि त्याची पत्नी मेहजबीन दोघेही आजारी असतात आणि आपतकालिन स्थितीत वेळेवर उपचार मिळावे यासाठी त्यांनी हा बंगला खरेदी केला आहे.
- दाऊदचे सध्याचे वय 59 वर्षे आहे. रॉच्या नेतृत्वात त्याच्या कुटुंबांचे ट्रॅव्हल डॉक्यूमेंट्स इतर तपास संस्थांनी शोधून काढले आहेत.
दाऊद केव्हा भारतातून पळाला
- अंडरवर्ल्डमध्ये दाऊद नावाचा शिक्का चालायला लागल्यानंतर भारतातील कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी 1986 मध्ये तो दुबईला पळून गेला होता.
- शारजाला होणाऱ्या क्रिकेट सामन्यांवेळी स्टेडियममध्येही तो दिसत होता.
- 1993 मध्ये झालेल्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटानंतर त्याचे अनेक फोटो समोर आले होते.
- त्यानंतर तो सार्वजनिक कार्यक्रमात जाण्याचे टाळू लागला होता, आणि पाकिस्तानने त्याला आपल्या देशात राहाण्याची परवानगी दिली.
- मीडिया रिपोर्टनुसार, त्याला पाकिस्तानची गुप्तचरसंस्था आयएसआयकडूनही सुरक्षा पुरवली जाते.
- पाकिस्तान 23 वर्षांपासून या दहशतवाद्याला आपल्या देशात सांभाळत आहे, मात्र वेळोवेळी त्यांनी ते नाकारले आहे.
- त्याचा पहिला पासपोर्ट साइज फोटो गेल्यावर्षी ऑगस्ट आणि फुल साइज फोटो शुक्रवारी (22 एप्रिल) समोर आला आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा,
>> याआधी समोर आलेले दाऊदचे फोटो
>> दाऊदच्या कुटुंबाच्या डॉक्यूमेंट्समध्ये काय-काय सापडले