आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवे हज धोरण : सबसिडी बंदचा प्रस्ताव, विमानाएेवजी जहाजाने यात्रेची शिफारस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सन २०१८ पासून लागू होणाऱ्या नव्या हज धोरणाचा मसुदा तयार झाला आहे. शनिवारी अल्पसंख्याक प्रकरणांचे मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांना सादर केलेल्या मसुद्यात हज सबसिडी बंद करण्याचा प्रस्ताव आहे. माजी सचिव अफजल अमानुल्लाह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केलेल्या मसुद्यात एकूण १६ शिफारशी अाहेत. 

खर्च कपातीसाठी यात्रेकरूंना हवाई मार्गाने पाठवण्याऐवजी सागरी मार्गाने पाठवण्याचीही शिफारस आहे. सूत्रांनुसार, मसुदा तयार करताना २०१२ चा सुप्रीम कोर्टाचा आदेश विचारात घेतला आहे. कोर्टाने २०२२ पर्यंत सबसिडी बंद करण्यास सांगितले होते. सूत्रांनुसार, सबसिडीतून वाचलेली रक्कम मुस्लिमांचे शिक्षण, सबलीकरण व कल्याणकारी योजनांवर खर्च केली जाईल.
बातम्या आणखी आहेत...