आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठांसाठी नवे आरोग्य धाेरण, दारिद्र्य रेषेखालील ज्येष्ठांना विशेष आरोग्य सेवेचा लाभ मिळणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- ज्येष्ठ नागरिकांना अाजारपणात उत्तम अाराेग्य सेवा मिळावी, अाराेग्य विमा मिळावा, शिवाय अपंगत्वावर मात करण्यासाठी उपकरणे सहजतेने उपलब्ध व्हावीत यासाठी केंद्र सरकार नवे राष्ट्रीय धाेरण लवकरच जाहीर करणार अाहे. ज्येष्ठांसाठी असलेले नॅशनल पॉलिसी आॅफ ओल्डर पर्सन्स (नोपो) या १९९९ हे धाेरण नव्या निर्णयामुळे कालबाह्य होईल.

६० वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी नवे धोरण जाहीर करण्यापूर्वी राष्ट्रीय परिषदेची बैठक ३० आॅगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे. नव्या धाेरणात ज्येष्ठांसाठी काेणकाेणत्या सवलतींचा समावेश करावा यासाठी सामाजिक न्याय मंत्रालयाने िवचारविनिमय सुरू केला आहे. या बैठकीत सरकारच्या नव्या धोरणाची चिकित्सा पुनर्विलोकन करण्यात येणार अाहे. त्यानंतर या धोरणाला अंतिम रूप दिले जाईल. त्यात दारिद्र्य रेषेखालील ज्येष्ठांना विशेषत्वाने सवलती दिल्या जातील. अाराेग्यासाेबतच ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी भादंवि अाणि मेंटेनन्स अँड वेल्फेअर आॅफ पेरेंटस अँड सिटिझन्स अॅक्ट २००७ मध्ये अत्यावश्यक दुरुस्त्या करण्याचा सरकारचा मानस अाहे. वार्धक्यात त्यांची काळजी घेण्याचे संस्कार तरुण पिढीमध्ये अपवादानेच पाहायला मिळतात. वृद्धांना सुरक्षा देणारा कायदा केंद्राने अाणताना पाल्यांची जबाबदारीही निश्चित करावी अशी माहिती दिली. वृद्धांची काळजी घेण्यासाठी तरुणांना स्किल इंडियाच्या माध्यमातून विशेष प्रशिक्षण देण्याची सूचना त्यांच्याद्वारे करण्यात अाली अाहे.

संपत्तीसाठी दरवर्षी दोन हजार वृद्धांचे खून
देशातअाणि विदेशात वास्तव्यास असलेल्या श्रीमंत मुलांनी पालकांना रस्त्यावर साेडून दिलेल्या वृद्धांना दिल्लीत अाश्रय देणारे ‘द अर्थ सेव्हियर’ या सामाजिक संस्थेचे संस्थापक रवी कालरा यांनी ज्येष्ठांच्या कशा हालअपेष्टा हाेतात याची भयावह माहिती दिली. ते म्हणाले, दरवर्षी दीड ते दाेन हजार वृद्धांचे खून हाेतात. भारतात काेट्यवधी ज्येष्ठांची संपत्तीसाठी त्यांच्या नातेवाइकांकडून फसवणूक केली जाते.
बातम्या आणखी आहेत...