आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होंडाची नवी सिटी 2017 कार झाली लाँच, स्टाइलिश व स्पोर्टी डिझाइन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली -प्रवासी कार निर्मितीत आघाडीवर असलेल्या होंडा कार्स इंडिया लिमिटेड कंपनीने आपली नवी सिटी २०१७ कार नुकतीच बाजारात सादर केली आहे. नावीन्यपूर्ण स्टाइलिश व स्पोर्टी डिझाइन, सुरक्षेच्या उत्तम सुविधा आणि अद्ययावत उच्च तंत्रज्ञानयुक्त इन्फोटेनमेंट सिस्टिमसह ही नवी कार सादर करण्यात आली आहे.  

या प्रसंगी होंडा कार्सचे अध्यक्ष व सीईओ योईचिरो युएनो म्हणाले, होंडा सिटी ही देशातील आमची सर्वात यशस्वी कार आहे. आतापर्यंत देशातील ६.५ लाख संतुष्ट ग्राहक ही याची पावती आहे. देशात १९८८ ला ही कार लाँच झाली, तेव्हापासून ही सर्वाधिक यशस्वी सेडान कार बनली आहे. गुणवत्तेच्या आधारे हा एक आदर्श असून जेडी  पॉवर इनिशियल क्वालिटी स्टडी यांच्या तर्फे या कारला आतापर्यंत १४ वेळा क्रमांक एकचा दर्जा मिळालेला आहे.  नव्या होंडा सिटी २०१७ कार मध्ये इंटीग्रेटेड एलईडी डीआरएल, इनलाइन एलईडी हेडलँप, एलईडी फॉग लँप, मोठ्या आकाराच्या चाकांसह नवीन  १६ इंचाचे एलॉय व्हील, डिजीपॅडसह टच स्क्रीन आदी सुविधा आहेत.
बातम्या आणखी आहेत...