आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Institution Will Settle On Behalf Of Planning Commission, Divya Marathi

नियोजन आयोगाच्या जागी नवी संस्था, पंतप्रधान मोदींची लाल किल्ल्यावरून घोषणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशात सध्या कार्यरत असलेला नियोजन आयोग बरखास्त करून त्या जागी एक नवी संस्था सुरू केली जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केली.
स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात ते बोलत होते. या उत्स्फूर्त भाषणात पंतप्रधानांनी अनेक योजनांची घोषणा केली. गरिबांसाठी जन-धन योजना सुरू केली जाणार असून याद्वारे लोकांना विमा संरक्षण दिले जाणार आहे. प्रत्येक खासदाराने एक गाव दत्तक घेऊन ते आदर्श बनवावे यासाठी खासदार आदर्श ग्राम योजनाही त्यांनी या वेळी घोषित केली.
जातीयवाद : जातीय हिंसाचारावर 10 वर्षांसाठी नियंत्रण लावावे, आतापर्यंत केलेली पापे मागे सोडून देशाला पुढे नेण्याचा संकल्प करावा. आपण ते करू शकतो, असे आवाहन पंतप्रधानांनी या वेळी केले.
हिंसाचार : देशातील युवकांनी हिंसाचाराचा मार्ग सोडायला हवा. भूलथापा, अफवांना बळी पडू नये. भारतभूमीला देशातील युवकांकडून हीच अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटले.

घोषित नव्या योजना
पंतप्रधान जन-धन योजना : या योजनेअंतर्गत प्रत्येक गरीब कुटुंबाचे बँकेत खाते उघडून डेबिट कार्ड दिले जाईल, तसेच खातेधारकाला 1 लाख रुपयांचे विमा संरक्षणही दिले जाईल.
खासदार आदर्श ग्राम योजना : खासदाराने त्यांच्या मतदारसंघातील 3 ते 5 हजार लोकसंख्या असलेले एक गाव निवडून 2016 पर्यंत ते गाव आदर्श बनवावे लागेल.
शाळांमध्ये मुलींसाठी वेगळे शौचालय : प्रत्येक शाळेत मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असेल. औद्योगिक संस्थांनी त्यांच्या सामाजिक बांधीलकी उपक्रमांतर्गत (सीएसआर) शाळांमध्ये शौचालय बांधण्यासाठी मदत करावी, असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.