आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगी सुरक्षा गार्डसाठी नवे कायदे तयार होणार; केंद्र सरकारची माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- खासगीसुरक्षा गार्डसाठी नवे कायदे तयार केले जाणार आहेत. केंद्र सरकारने ही माहिती सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. सरकारने सांगितले की, खासगी रक्षकांना बंदुकांचे परवाने देणे तसेच गार्डची नियुक्ती करणार्‍या एजन्सीजवर नियंत्रण आदी मुद्द्यांसंदर्भातही नियमावली तयार केली जाणार आहे. या कायद्याचा आराखडा तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती सरकारने न्यायालयात दिली.

गृहमंत्रालयाच्या वतीने अॅडिशनल सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयात बाजू मांडली. न्यायमूर्ती जे. एस. खेहड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सांगितले की, न्यायालयाने यासंदर्भात विचारलेल्या चार प्रश्नांसंदर्भात एक समिती स्थापन करण्यात आली आहे. नोव्हेंबर २०१२ मध्ये उद्योजक पोंटी चढ्ढा त्यांच्या भावाच्या खासगी सुरक्षा रक्षकांनी परस्परांवर अंदाधुंद गोळीबार केला होता. त्यात दोन्ही भावांचा मृत्यू झाला होता. या घटनेचे न्यायालयाने स्वत: होऊन दखल घेतली होती. त्या वेळी न्यायालयाने हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याचे त्यावर सरकारने गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते. न्यायालयाने गृहमंत्रालयाला निर्देश देताना म्हटले होते की, या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

न्यायालयाने सरकारला विचारलेले प्रश्न
>खासगी सुरक्षा रक्षक, एजन्सीजचे नियंत्रण कोणत्या कायद्याद्वारे केले जाते?
> खासगी सुरक्षा रक्षकांना बंदूक शस्त्र परवाना जारी करताना कोणते मापदंड ठरवले गेले आहेत?
>खासगी रक्षक शस्त्रांचा वापर कधी करू शकतात? त्यासाठी दशानिर्देश लेले आहेत की नाहीत?
>कायद्यानुसार खासगी सुरक्षा एजन्सीजकडे कोणते अिधकार आहेत त्यांचे कर्तव्य काय आहे?