आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Measures For PM Narendra Modi’S Security: Two Routes, A Dummy Convoy

ऐनवेळी बदलतो पंतप्रधान मोदींचा मार्ग; सुरक्षेसाठी केला जातो डमी ताफ्याचा वापर!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दहशतवाद्यांच्या हिट लिस्टवर आहेत. या पार्श्वभूमीवर मोदींच्या सुरक्षेसाठी खास उपाययोजना करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी यांच्या मार्गात ऐनवेळी बदल केला जात असल्याचे एका सुरक्षा अधिकारीने सांगितले. विशेष म्हणजे मोदींच्या ताफ्याचा कार्यक्रम आखताना दोन मार्ग निश्चित केले जात असल्याचे 'हिंदुस्‍तान टाइम्‍स'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे.

दोन मार्ग, दोन ताफे...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दहशतवाद्यांकडून मोठा धोका आहे. या पार्श्वभूमीवर मोदींच्या सुरक्षेसाठी मोठी सुरक्षा व्यवस्था तयार करण्यात आली आहे. मोदींच्या सुरक्षेसाठी आधीच दोन मार्ग निश्चित केले जातात. विशेष म्हणजे मोदींच्या ताफ्यासोबत एक डमी ताफाही असतो. सुरुवातीला दोन्ही मार्गांवरील वाहतूक बंद केली जाते. ऐनवेळी नरेंद्र मोदींच्या ताफ्याचा मार्ग बदलला जातो. याबाबत कमालीची गोपनियता पाळली जाते. स्‍पेशल प्रोटेक्‍शन ग्रुपतर्फे (एसपीजी) नरेंद्र मोदी यांना सुरक्षा पुरवली जाते.

नरेंद्र मोदींच्या सुरक्षेसाठी खास यंत्रणा...
नरेंद्र मोदी यांना 'लष्कर-ए-तोयबा' आणि 'जैश-ए-मोहम्‍मद' सारख्या पाकिस्तानी दहशतवादी संघटनांकडून मोठा धोका आहे. याशिवाय इंडियन मुझाहिदीन (आयएम) आणि सिमीचाही मोदींवर निशाणा आहे. मोदींच्या ताफ्यावर दहशतवादी संघटनांकडून हल्ला होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मोदींच्या सुरक्षेसाठी खास यंत्रणा उभारण्यात आली आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदी यांना टार्गेट करण्यासाठी दहशतवादी संघटनांनी गेल्या काही दिवसांपूर्वी दोन बैठका घेतल्याचे गुप्तचर खात्याने सांगितले आहे. नेपाळ आणि पाकिस्तानात या बैठका झाल्या. नेपाळमध्ये 'आयएम' आणि 'सिमी'ची बैठक झाली. दूसरी पाकिस्‍तानात झाली. त्यात लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आयबीने दिली आहे.

(फाइल फोटो: एसपीजीच्या सुरक्षाकवचमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा)