आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Museum In Rashtrapati Bhavan Will Be Inaugurated Today

राष्ट्रपती भवनातील आठवणी होणार सार्वजनिक, आजपासून खुले होणार संग्रहालय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजपर्यंत देशात होऊन गेलेल्या राष्ट्रपतींना मिळालेल्या अमुल्य भेटवस्तू, त्यांनी वापरलेले साहित्य, फर्निचर, येथील चित्रे, कलाकृती या सर्व आता सामान्य नागरिकांनाही पाहायला मिळणार आहेत. राष्ट्रपती भवनामध्ये या सर्व वस्तुंसाठी एक संग्रहालय बनवण्यात आले आहे. राष्ट्रपती भवनातील रिकाम्या तबेल्याच्या ठिकाणी हे संग्रहालय उभारण्यात आले आहे.
शुक्रवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी एका विशेष सोहळ्यात या संग्रहालयाचे लोकार्पण करणार आहेत. यावेळी उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती असेल. संग्रहालयात राष्ट्रपती भवन तयार करण्याची कथा, शस्त्रे, आणि राष्ट्रपतींनी वापरलेली बग्गीही पाहायला मिळणार आहे. हे संग्रहालाय शुक्रवार, शनिवार आण रविवारी असे आठवड्यातून तीन दिवस सर्वांसाठी खुले राहणार आहे. संग्रहालय पाहण्यासाठी ऑनलाइन बुकिंगही करता येऊ शकेल. किंवा थेट पोहोचून मदर क्रीसेंट रोडकडून गेट क्रमांक 30 मधून येऊनही हे संग्रहालय पाहता येईल. 1 ऑगस्टसाठी सामान्य नागरिकांसाठी हे खुलणार आहे. ऑक्टोबरपर्यंत याठिकाणी कोणत्याही प्रकारचे शुल्कही लागणार नाही.
पुढे पाहा, या संग्रहालयातील काही निवडक PHOTOS