आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या ऑर्डर वाढल्याने उत्पादन क्षेत्रात तेजी, पीएमआय ५१.७ वर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नव्याने मिळालेल्या ऑर्डर्समुळे देशातील उत्पादन क्षेत्राने तेजीने विकास करत चार महिन्यांचा उच्चांक गाठला आहे. “निक्केई मार्केट इंडिया मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजर्स इंडेक्स’ - पीएमआय जुलै महिन्यात वाढून ५१.८ वर पोहोचला आहे, जो जून महिन्यामध्ये ५१.७ वर होता. हा निर्देशांक ५० च्या वरती असेल तर विकासात तेजी नसता मंदी असल्याचे मानले जाते. महागाईचा दबाव कमी झाल्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करण्याची शक्यताही निक्केईच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

वर्ष २०१६ मधील दुसऱ्या सहा महिन्यांत उत्पादन अर्थव्यवस्थेत पुन्हा वाढ होत असल्याचे अर्थतज्ज्ञ पालिआना डे लिमा यांनी सांगितले आहे. जुलै महिन्यात उत्पादन आणि मागणी या दोन्हींमध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे. देशांतर्गत बाजाराबरोबरच जागतिक बाजारातील मागणी वाढली आहे. मार्च महिन्यानंतर एकूण नव्या व्यवसायात वाढ झाली असल्याचेही लिमा यांनी सांगितले.

या सर्व्हेनुसार मार्च महिन्यानंतर उत्पादन विकास दर सर्वात जास्त वाढला आहे. सर्व्हेमध्ये समावेश असलेल्या एक टक्क्यापेक्षा जास्त कंपन्यांनी जुलै महिन्यात अतिरिक्त रोजगार दिले आहेत, तर अनेक कंपन्यांनी नोकरीच्या संख्येत कोणताच बदल केला नसल्याचे सांगितले आहे. जुलै महिन्यात कंपन्यांनी आपल्या गुंतवणुकीतही घट केली आहे, ज्यामुळे कंपन्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. असे असले तरी कंपन्यांनी आपल्या उत्पादनाचे दर वाढवले आहेत. यातून कंपन्या आपला नफा वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचे लक्षात येते, असेही पालिआना यांनी सांगितले.

रुपयात घसरणीचा फायदा : भारतीय रुपयाच्या किमतीत झालेल्या घसरणीचा निर्यातीला फायदा झाला असल्याचे मतही या अहवालात व्यक्त करण्यात आले आहे. विदेशातून मिळालेल्या आॅर्डरबाबत जानेवारीनंतर जुलै महिन्यात तेजीने वाढ झाली आहे.

राजन यांच्या कार्यकाळातील शेवटचा आढावा
भारतीय रिझर्व्ह बँक पतधोरणाचा आढावा घेताना या वेळी व्याजदरात कपात करू शकते, असे मतही अर्थतज्ज्ञ पालिआना डे लिमा यांनी व्यक्त केेले आहे. रिझर्व्ह बँक ९ ऑगस्टला यासंबंधी घोषणा करणार आहे. गव्हर्नर म्हणून रघुराम राजन यांच्या कार्यकाळातील ही शेवटची आढावा बैठक असणार आहे. त्यामुळे उद्योग जगताला भेट स्वरूपात ते व्याजदर कपात करतील, अशी आशा वाटत आहे.
बातम्या आणखी आहेत...