आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RARE PHOTOS: ज्यामुळे ओळखले जावे अशी इच्छा होती, तेच काम करताना गेले डॉ. कलाम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2003 मध्ये श्रीनगर दौऱ्यादरम्यान डॉ. अब्दुल कलाम. - Divya Marathi
2003 मध्ये श्रीनगर दौऱ्यादरम्यान डॉ. अब्दुल कलाम.
नवी दिल्ली - माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे सोमवारी सायंकाळी शिलाँगमध्ये निधन झाले. शिलाँग येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे व्याख्यानासाठी ते गेले होते. तेव्हाच त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि ते बेशुद्ध पडले. त्यांना शिलाँगच्या बेथानी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सायंकाळी 7.45 वाजता त्यांची प्राणज्योत मालवल्याची घोषणा करण्यात आली. कलाम नेहमी म्हणत, की मी एक शिक्षक आहे आणि तिच माझी ओळख असली पाहिजे अशी माझी इच्छा आहे... शिलाँगमध्ये लव्हेबल प्लॅनेट अर्थ विषयावर व्याख्यान देत असतानाच ते जगातून गेले.

एका सर्वसामान्य मुलापासून डॉ. कलाम बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता. मात्र, त्यांच्या आयुष्याचे सूत्रच होते, की छोटे स्वप्न पाहू नका, जी जबाबदारी स्विकाराल तिल्या नवीन आयाम द्या. कायम लोकांच्या संपर्कात राहात असल्यामुळे त्यांना जनतेचा राष्ट्रपती देखील म्हटले जात होते. वयाच्या 84 व्या वर्षी देखील ते सक्रिय होते. स्वतःला शिक्षक म्हणवून घेण्यात धन्यता मानत असलेले कलाम कायम अॅक्टीव्ह मोडमध्ये राहात होते. एका सर्वसाधारण घरातून देशाच्या सर्वोच्च पदापर्यंतचे त्यांचे जीवन सर्वांनाच प्रेरणादायी राहील.
पुढील स्लाइडमध्ये, डॉ. कलाम यांची खास छायाचित्रे आणि त्यांचा जीवनपट