आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Record Of Voting In 11 States News In Divya Marathi

रेकॉर्डब्रेक मतदान : देशातील मतदानात दोन ते 17 टक्के वाढ; विदर्भात विक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गुरुवारी 11 राज्ये व 3 केंद्रशासित प्रदेशातील मतदारराजाने भरभरून मतदार केले. देशभरात 91 जागांवर विक्रमी मतदान झाले. मतदानात 2 ते 17 टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवण्यात आली. दिल्ली, हरियाणा, केरळ आणि चंदिगडमधील सर्व जागांवर मतदान झाले. यात चंदिगडमध्ये 74 टक्के, हरियाणात 73, तर दिल्लीत 64 टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. मतदानाच्या बाबतीत केरळ आजही सर्वात पुढे असून तेथे 76 टक्के मतदान झाले. दिल्लीत यंदा 2009 च्या तुलनेत 13 टक्के मतदान वाढले. बिहार आणि छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भागात हिंसेच्या किरकोळ घटना घडल्या. या हल्ल्यांत तीन जवान शहीद झाले.

विदर्भात विक्रम
विदर्भातल्या दहा मतदारसंघात यंदा विक्रमी मतदान झाले आहे. मतदानाची टक्केवारी गेल्या लोकसभेच्या तुलनेत वाढली असून, सरासरी 62.36 टक्के इतके मतदान झाले आहे. अकोला, अमरावती,भंडारा गोंदिया आणि गडचिरोली-चिमूर मतदारसंघात 65 टक्के इतके सर्वाधिक मतदान झाले. सर्वात कमी म्हणजे 58.66 टक्के इतके मतदान बुलडाण्यात झाले. विशेष म्हणजे गेल्या वेळच्या तुलनेत नागपुरात मतदानात 15.96 टक्क्यांची वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील गुरुवारी पार पडलेल्या या पहिल्या टप्प्यात विदर्भातल्या दहा जागांवरील 201 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. राज्यात पुढचा टप्पा 17 एप्रिल रोजी आहे.

(फोटो : जगातील सर्वात कमी उंचीची महिला (63 सेंमी) म्हणून गिनीज बुकात नोंद असलेल्या वीसवर्षीय ज्योती आमगे हिने गुरुवारी नागपुरात मतदानाचा हक्क बजावला. पहिल्यांदा मतदान केल्यानंतर ज्योतीला अक्षरश: गगनच ठेंगणे झाले.)

विदर्भातील मतदानाची आकडेवारी जाणून घेण्यासाठी पुढील फोटोवर क्लिक करा...