आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता फुकटे प्रवासी रेल्‍वेला चुना लावूच शकणार नाहीत, नियमांत झाले बदल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रेल्‍वेने जनरल तिकिटांच्‍या नियमांत केलेला बदल आज (मंगळवार)पासून लागू झाले आहेत. त्‍या अनुषंगाने 199 किमीपर्यंतच्‍या प्रवासाचे तिकीट केवळ तीन तास व्‍हॅलिड राहणार असल्‍याची माहिती रेल्‍वे राज्‍य मंत्री मनोज सिन्हा यांनी संसदेत दिली. रेल्‍वेचा तोटा कमी कमी करण्‍यासाठी हा निणर्य घेण्‍यात आला असून, तो 200 किमी पेक्षा अधिक प्रवासासाठी लागू नाही.
- प्रवाशांना तिकीट घेतल्‍यानंतर तीन तासांच्‍या आतच ट्रेन पकडावी लागणार आहे. जर तसे केले नाही तर विनातिकीट प्रवास म्‍हणून दंड भरावा लागेल.
- एखाद्या प्रवाशाने पूर्णा येथून नांदेडसाठी किंवा अकोला येथून बडनेऱ्यासाठी जनरल तिकीट घेतले आणि त्‍यानंतर तीन तासांत एकही ट्रेन त्‍या दिशेन जाणार नसेल तर अशा परिस्‍थ‍ितीत तीन तासानंतर येणाऱ्या पहिल्‍या ट्रेननेच जावे लागेल. त्‍यानंतर हे तिकीट अनधिकृत होणार आहे.
- 199 किलोमीटरच्‍या प्रवासासाठी जनरल तिकीटावर आता कुठलाच परतावा मिळणार नाही.
- 200 किलोमीटर पेक्षा अधिक प्रवासाच्‍या नियमांमध्‍ये बदल झाला नाही.
- सध्‍या देशातील 29 रेल्‍वे स्‍टेशनवर मोबाइलच्‍या माध्‍यमातून पेपरलेस प्लेटफॉर्म तिकीट बुकिंग होत होत आहे.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, प्रवासी कसा लावत होते चुना....