आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...या पाच टप्प्यात करा SMS ने रेल्वे आरक्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/ मुंबई - रेल्वे मंत्रालयाने एक जुलैपासून एसएमएस द्वारे रेल्वे तिकीट आरक्षण सुरु केले आहे. ज्यांना इंटरनेट वापरता येत नाही अशा नागरिकांना या सुविधेचा अधिक फायदा आहे. रेल्वेने सुरु केलेली ही सुविधा तुम्ही पाच टप्प्यांमध्ये पूर्ण करुन तुमचे तिकीट आरक्षित करु शकता.

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी
प्रथम तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक बँक आणि IRCTC कडे नोंदवावा लागेल. बँक तुम्हाला पेमेंटसाठी MMID (मोबाईल मनी आयडेंटीफायर) आणि OTP (वन टाईम पिन) देईल. सध्या 25 हून अधिक बँकांनी ही सुविधा सुरु केली आहे.

MMID आणि OTP मिळाल्यानंतर तुम्ही मोबाईलच्या मॅसेज बॉक्समध्ये मॅसेज टाईप करा. तो पुढील प्रमाणे BOOK (स्पेस) ट्रेन क्रमांक (स्पेस) स्टेशनचा कोड (ज्या ठिकाणाहून प्रवास करायचा आहे) (स्पेस) प्रवासाची तारीख dd/mm (स्पेस) श्रेणी Class (स्पेस) प्रवाशाचे नाव (स्पेस) वय (स्पेस) स्त्री/पुरुष (स्पेस) टाईप करा. यानंतर हा मॅसेज 139 किंवा 5676714 या क्रमांकावर पाठवा.

तिस-या टप्प्यात तुमचा SMS मिळाल्यानंतर IRCTC तुम्हाला ट्रान्झॅक्शन आयडी पाठवेल. आता तुम्हाला PAY च्या पुढे ट्रान्झॅक्शन आयडी आणि OTP लिहून SMS करावा.

चौथा टप्प्यात, तुमचे तिकीट आरक्षित होईल आणि तुमच्या बँक खात्यावरून पैसे काढले जातील.

त्यानंतर IRCTC कडून तुम्हाला SMS येईल. त्यात तुम्हाला सांगितले जाईल की, तुमचे तिकीट आरक्षित झाले आहे. या SMS मध्ये तुमच्या प्रवासासंबंधीची संपूर्ण माहिती दिलेली असेल. प्रवासादरम्यान टीटीईने तुम्हाला तिकीट मागितल्यानंतर हाच SMS दाखवावा.

SMS सुविधा सकाळी 8 ते 12 या वेळेत ARP/तत्काळ/जनरल तिकीट यांसाठी उपलब्ध नसेल.