आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुन्हेगारांनाही दाखल करता येईल फेरविचार याचिका, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या गुन्हेगारांच्या बाजूने सुप्रीम कोर्टाने मंगळवारी निर्णय दिला आहे. फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेले दोषी फेरविचार याचिका दाखल करू शकतात, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. विशेष म्हणजे दोषींची फेरविचार याचिकेवरील सुनावणी खुल्या कोर्टात घेण्यास सुप्री‍म कोर्टाने परवानगीही दिली आहे.

सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आर. एम. लोढा यांच्या नेतृत्त्वाखालील न्यायपीठासमोर मंगळवारी 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी याकूब मेमनसह त्याच्या अन्य सहकार्‍यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. मेमन याने फेरविचार याचिकेवरील सुनावणी खुल्या कोर्टात करण्याची मागणी केली होती. कोर्टाने मेमनसह त्याच्या साथीदार्‍यांची ही मागणी मान्य केली आहे. यापूर्वी कोर्टाने मेमनसह अन्य दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. आता सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे मेमनसह देशातील अन्य दोषींना आपले म्हणणे पुन्हा एकदा मांडण्याची संधी मिळणार आहे.
कोर्टाच्या न‍िर्णयानुसार, ज्या दोषींची फेरविचार याचिका यापूर्वी फेटाळण्यात आली आहे. मात्र, त्यांच्या फाशीची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही, ते सर्वजण सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा फेरविचार याचिका दाखल करू शकतात असेही कोर्टाने यावेळी स्पष्ट केले आहे. दोषींच्या फेरविचार याचिकेवर तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात येईल. फेरविचार सुनावणीसाठी 30 मिनिटांचा कालावधी निश्चित करण्‍यात आला आहे. परंतु 'क्यूरेटिव्ह पिटीशन'वर हा निर्णय लागू नसल्याचेही सुपीम कोर्टाने स्पष्ट केले आहे.
पुढील स्लाइड्‍सवर वाचा, या गुन्हेगारांना मिळू शकतो सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा फायदा...

(फाइल फोटो)