आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Schemes For Indian Government Employee Latest News

सातव्या वेतन आयोगानंतर नोकरदारांसाठी केंद्र सरकार आणखी पेटारा उघडण्याची शक्यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर संघटीत क्षेत्रातील कर्मचा-यांना खूष करणा-या घोषणा करण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे. निवृत्ती वेतन, बोनस आणि पीएफ मधील कपातीमुळे वेतनाची मर्यादा वाढवण्यासंबंधीतील या घोषणा असण्याची शक्यता आहे. कामगार मंत्री ऑस्कर फर्नांडिस आज बैठकीनंतर यासंबंधीची मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.
या घोषणा केल्या जाणार
ईपीएफ खातेदारांना कमीतकमी एक हजार रुपये मासिक निवृत्तीवेतन देण्याची घोषणा होऊ शकते. यामुळे 28 लाख लोकांना फायदा होऊ शकतो. ज्यात पाच लाख विधवा देखील आहेत. सध्या 44 लाख निवृत्तीवेतन धारक आहेत.
पीएफच्या कपातीसाठी वेतन मर्यादा 6500 रुपयांहून वाढवून 15000 रुपये दरमहा करण्याची शक्यता आहे. यामुळे 50 लाख नव्या कर्मचा-यांना ईपीएफ द्वारा सुरु असलेल्या सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ मिळू शकतो. या योजनेचा लाभ सध्या 1.7 कोटी लोकांना होत आहे.
सरकार या योजनेसाठी 1217 कोटी रुपये अतिरिक्त निधी देणार आहे. कमीत कमी एक हजार रुपये दरमहा निवृत्तीवेतन योजना 1 एप्रिल 2014 -15 पासून सुरु होण्याची शक्यता आहे.
ग्रॅच्यूटी अंशदानासाठी वेतन मर्यादा 15,000 रुपये दरमहा केली जाण्याची शक्यता आहे.
कंपनी तोट्यात असल्यानंतरही कर्मचा-यांना एका ठोस रक्कम बोनस स्वरुपात दिली गेली पाहिजे.