आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • New Surgeon General’S Report Shows Cigarettes Are More Deadly Today Than 50 Years Ago

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गेल्या पन्नास वर्षात कित्येक पटींनी वाढला आहे सिगारेमधील विषारीपणा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - धुम्रपान आता पूर्वीपेक्षा अधिक धोकादायक आणि जीवघेणे होत चालले आहे. गेल्या पाच दशकांपासून धुम्रपान कंपन्यांकडून सिगरेट बनवण्याच्या चित्रविचित्र पद्धती हे त्यामागचे कारण आहे. 'कॅम्पेन फॉर टोबॅको फ्री किड्स'च्या मते, गेल्या 50 वर्षांत सिगरेट तयार करण्याच्या पद्धतीत अनेक बदल झाले आहेत. या अभियानात सहभागी असलेल्या डॉक्टरांचे म्हणणे आहे की, आज मिळणार्‍या सिगरेट्स 1964 मध्ये विकल्या जाणार्‍या सिगरेट्सच्या तुलनेने आरोग्यासाठी अधिक धोकादायक ठरत आहेत. संशोधनाच्या मते, मागच्या पन्नास वर्षात सिगरेटची डिझाइन आणि याला बनवणासाठी लागणार्‍या गोष्टींमध्ये बदल केल्याने धुम्रपान अधिक जीवघेणे झाले आहे. 'कॅम्पेन फॉर टोबॅको फ्री किड्स'चे संशोधन तंबाखू उद्योगाशी संबंधित दस्तावेज आणि शास्त्रीय अभ्यासावर आधारित आहे.
काय सांगतो रिपोर्ट
रिपोर्टनुसार, सध्या सिगरेट ओढणार्‍या लोकांमध्ये कॅन्सर आणि श्वसनासंबंधित आजार होण्याचा धोका वाढला आहे. गेल्या पन्नास वर्षात तंबाखू कंपन्यांनी तयार केलेल्या उत्पादनांमुळे व्यवसन जडण्याची शक्यता अधिक वाढली आहे. या तरुमांमुळे तरुण त्याकडे अधिक आकर्षित होतात आणि त्यामुळेच ती त्यांच्यासाठी अधिक धोकादायक ठरत आहेत.
50 वर्षात झालेला बदल
तरूणांमध्ये सिगरेटचे व्यसन निर्माण करण्यासाठी तंबाखू कंपन्या अनेक जीवघेण्या ट्रिक्स वापरत आहेत. खालील काही मुदद्यांद्वारे सिगरेटमध्ये झालेले बदल टिपण्याचा प्रयत्न केला आहे.
लेवुलिनिक अ‍ॅसिड
अ‍ॅसिड सॉल्‍ट्स मिळवल्यामुळे निकोटीनचा कडवटपणा कमी होतो आणि सिगरेटचा कश आणखी स्‍मूथ होतो.
मेंथॉल
हे मिळवल्यामुळे सिगरेट ओढताना घशाला ठंडावा मिळतो आणि त्यामुळे सिगरेट ओढणार्‍यांना चांगले वाटते.
सच्छिद्र फिल्टर
सिगरेटमध्ये वापरले जाणारे सच्छिद्र फिल्टरमुळे सिगरेट ओढणारी व्यक्ती सहजरित्या कश घेऊ शकतो.
अ‍ॅडेड शुगर आणि अ‍ॅसिटएल्‍डीहाइड
अ‍ॅडेड शुगरच्या वापराने सिगरेटचा धूर सहज गळ्यातून उतरायला मदत होते, दुसरीकडे अ‍ॅसिटएल्‍डीहाइड निकोटीनचा नशीला प्रभाव वाढवतो.

अमोनिया कंपाउंड
अमोनियाचे अनेक प्रकारचे कंपाउंड मिसळल्याने निकोटीनचा मेंदूवर लवकर परिणाम होतो.
फ्लेवर्स
सिगरेटमध्ये अतिरिक्‍त फ्लेवर्सचा वापर केल्याने याचा कडू स्‍वाद कमी होतो, जेणेकरून ही मुलांनाही आकर्षक ठरते.
तंबाखू मिश्रण
अमेरिकन स्‍टाइल सिगरेट्समध्ये ब्‍लेंडेड टोबेको चा वापर केला जातो. यात कॅन्सर निर्माण करणारी तत्व अधिक प्रमाणात असतात.
तंबाखूची अधिक मात्रा
सिगरेट कंपन्या ठरलेल्या शेवटच्या मर्यादेपर्यंत तंबाखूचे प्रमाण वापरतात ज्यामुळे याच्या सेवनाचे व्यसन निर्माण होते.
फोटो - प्रतिकात्मक