आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

UP विधानसभेत गुन्हेगारी स्वरुपाचे सर्वाधिक MLA\'s भाजपचे, कोट्यधीशांची संख्या 19% वाढली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्वाधिक कलंकित आमदार भारतीय जनता पक्षात आहे. - Divya Marathi
सर्वाधिक कलंकित आमदार भारतीय जनता पक्षात आहे.
नवी दिल्ली - उत्तर प्रदेश विधानसभा निकालानंतर समोर आले आहे की सर्वाधिक 114  कलंकित आमदार भाजपचे आहेत. एडीआरे आणि उत्तर प्रदेश इलेक्शन वॉच रिपोर्ट्सनुसार कलंकित आमदारांची संख्या 2012 च्या तुलनेत 24% कमी झाली आहे. तीन अपक्ष आमदरांवर गंभीर गुन्हे आहेत. कोट्यधीश आमदारांच्या संख्येत गेल्या विधानसभेच्या तुलनेत 19% वाढ झाली आहे. सर्वाधिक आश्चर्यचकित करणारा आकडा वयाचा आहे. अर्धे आमदार पन्नाशीच्या आतील आहेत तर अर्धे पन्नाशी पार केलेले आहेत. 
 
सर्वाधिक 114 कलंकित आमदार भाजपचे 
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, 403 आमदारांपैकी 402 आमदारांची माहिती देण्यात आली आहे. 
- गुन्हेगारी खटल्यांच्या आधारे या आमदारांची वर्गवारी केली तर सर्वाधिक, 114 कलंकित आमदार हे भारतीय जनता पक्षाचे आहेत. 
- 403 पैकी 143 आमदारांवर गुन्हेगारी स्वरुपाचे खटले दाखल आहे. यातील 107 जणांवर गंभीर गुन्हे आहे. 
- भाजपचे एकमेव आमदार अरुणकुमार यांच्यावर महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल आहे. ते धामपूर येथून विजयी झाले. 
- गुन्हेगारी आमदारांमध्येही भाजप आघाडीवर आहे 27% आमदारांवर गुन्हेगारी खटले दाखल आहे. सर्वात कमी (14%) केसेस असलेले आमदार काँग्रेसकडे आहे. 
- 8 आमदारांवर हत्या, 34 आमदारांवार हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा आहे. 36% आमदार गुन्हेगारी कृत्यात आरोपी आहेत, 26% आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. 
 
पक्ष आमदार  कलंकित टक्केवारी 
भाजप      312     114 37%
सपा 46 14 30%
बसपा 19 5 26%
काँग्रेस 7 1 14%
अपक्ष 3 3 100%
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...