आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एनएसजी सदस्यत्वासाठी न्यूझीलंडचा पाठिंबा; तीन क्षेत्रांत करार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारताला एनएसजी अर्थात अणुपुरवठादार गटाचे सदस्यत्व त्याचबरोबर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे सदस्यत्व मिळावे यासाठी न्यूझीलंड आपला रचनात्मक पाठिंबा देईल, असे पंतप्रधान जॉन की यांनी स्पष्ट केले.

सध्या एनएसजीची प्रक्रिया सुरू आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. भारत-न्यूझीलंडमध्ये व्यापार, संरक्षण सुरक्षा अशा तीन क्षेत्रात करार झाले. भारत भेटीवर असलेल्या जॉन की यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी अन्य मंत्र्यांची भेट घेतली. त्यात उभय देशांत विविध मुद्द्यांवर सहमती झाली. त्या बैठकीत जॉन यांनी देशाची भूमिका स्पष्ट केली, परंतु त्यांनी भारताच्या सदस्यत्वाला स्पष्ट पाठिंबा असल्याचे मात्र सांगितले नाही. सध्या ही प्रक्रिया सुरू आहे. त्यात न्यूझीलंडचाही सहभाग आहे.

ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे जॉन की म्हणाले. एनएसजी गटात भारताला सदस्यत्व मिळावे, असे आम्हाला वाटते. त्यासाठी आमचा भारताला पाठिंबा राहणार आहे.

पाहुण्यांच्या स्वागताचे समाधान-मोदी
पंतप्रधानकी सणासुदीच्या काळात भारतात आले आहेत. त्यांचे अगत्य करण्याची संधी मिळाल्याचे आम्हाला समाधान आहे. खरे तर न्यूझीलंडच्या संसदेत दरवर्षी दिवाळी साजरी होते. त्यात कीदेखील उत्स्फूर्तपणे सहभागी होत असतात, असे मोदी यांनी म्हटले आहे.

चीनचा अडथळा
एनएसजीच्या सदस्यत्वासाठी अमेरिकेने भारताला पाठिंबा दिला, परंतु चीनने मात्र त्यात अडथळा आणला. त्यात न्यूझीलंडसह सात देशांचा समावेश आहे. अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर स्वाक्षरी केल्यानंतरच भारताला परवानगी देण्यात यावी, असे त्यांचे मत होते. आता मात्र सकारात्मकता दर्शवली.
बातम्या आणखी आहेत...