आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Zealands Omaka Classic Fighters Airshow Plane Crash News In Marathi

PHOTO: हवेत विमानाचा स्फोट होऊन झाले दोन तुकडे, पायलट थोडक्यात वाचला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑकलंड- न्यूझीलंडमध्ये 'ओमाका क्लासिक फायटर्स एअर शो'दरम्यान फॉक वुल्फ 190 या व्हिंटेज एअरक्राफ्टचा डावा ब्रेक लँडिंगआधी फेल झाला. पायलटने विमान नियंत्रणात ठेवण्याचा भरपूर प्रयत्न केला. या प्रयत्नात विमानात कानठळ्या बसतील असा आवाज करत स्फोट झाला. दोन तुकडे होऊन विमान कोसळले. वैमानिक किरकोळ जखमी झाला.

अहवालानुसार, पायलट फ्रँक पार्कर यांनी हिंमत हारता शोमध्ये पुन्हा भाग घेतला. एअर शोच्या आयोजक समितीचे अध्यक्ष ग्रॅहम ऑरफन यांनी सांगितले की, एअर शोमध्ये तांत्रिक बिघाडामुळे प्रथमच अशी दुर्घटना झाली. त्याचे आम्हाला खूप वाईट वाटते; पण पायलट फ्रँक यांची जिद्द मानावी लागेल. दुर्घटना झाली तरी एअर शो सुरुच होता. 100 पेक्षा जास्त विमाने शोमध्ये सहभागी झाले होते.

पुढील स्लाइडवर पाहा, एअर शोमध्ये कसरत दाखवणार्‍या विमानांचे फोटो...