आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'रिटर्न गिफ्ट': नवरदेवाची कार रस्त्यात थांबवून नववधूचे प्रियकरासोबत पलायन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोनीपत (हरयाणा)- दिल्लीतील एका तरुणाला नववधूने लक्षात राहील असे "रिटर्न गिफ्ट' दिले. लग्न करून नवरदेव सुखी संसाराची स्वप्ने रंगवत वधूला घेऊन जात असताना वाटेत कार थांबवून प्रियकरासोबत पलायन केले. दिल्लीतील शाहपूर येथील दीपकचे लग्न 20 मे रोजी पानिपतच्या शिवानीसोबत झाले होते. त्यानंतर दोन दिवसांनी दीपक पत्नीला घेऊन धार्मिक विधीच्या निमित्ताने गेला होता. तेथून दिल्लीला परत येत असताना वाटेत एका फ्लायओव्हरजवळ पत्नीने कार थांबवली.
दीपकने कार थांबवली असता पत्नी रस्ता ओलांडून पलीकडे निघाली. त्याने अडवण्याचा प्रयत्न केला असता धक्का देऊन ती प्रियकराच्या गाडीत बसून फरार झाली. दीपकने दिलेल्या तक्रारीवरून पोलिस तपास करत आहेत. शिवानीच्या वडिलांनी तिचा एक प्रियकर असल्याचे सांगितले. यावरून पोलिस शिवानी व तिच्या प्रियकाराचा शोध घेत आहेत. मात्र, दोघेही फरार आहेत. या दोघांना शोधण्यासाठी तीन पथके तयार करण्यात आली आहेत. दरम्यान, शिवानीचे वडिल दीपक यालाच आपला जावई मानत असल्याचे सांगत दीपकशी सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.
बातम्या आणखी आहेत...