आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नजीबचा शोध घेण्यात सीबीआयला स्वारस्य नाही; न्यायालयाने सीबीआयला फटकारले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रिहत - Divya Marathi
संग्रिहत
नवी दिल्ली - वर्षभरापासून जेएनयू विद्यार्थी नजीब अहमदप्रकरणी तपास सुरू असून अद्यापही त्याचा काही पत्ता लागला नाही. दिल्ली उच्च न्यायालयाने याप्रकरणी केंद्रीय अन्वेशन विभागाला (सीबीआय) फटकारले आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, नजीब अहमदला शोधण्यात सीबीआयला स्वारस्य नाही. 

सीबीआयला पाच महिन्यांपूर्वी या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला होता. दिल्ली उच्च न्यायालयाने अत्यंत कठोर शब्दांत सीबीआयवर टिप्पणी केली आहे. सीबीआयने न्यायालयात दिलेल्या अहवालातील माहिती विरोधाभासी दिसून आली आहे. स्टेटस रिपोर्टमध्ये संदिग्ध फोन कॉल्स आणि संदेशांचे विश्लेषण दिले होते. न्यायमूर्ती जी. एस. सिस्तानी यांच्या पीठाने म्हटले की, यातून काहीच निष्पन्न झालेले नाही. शिवाय कागदोपत्रीदेखील काहीच काम झालेले नाही. 
  
गेल्या वर्षी १५ ऑक्टोबर रोजी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू)काही विद्यार्थ्यांशी वाद झाल्यानंतर नजीब माही मांडवी वसतिगृहातून बेपत्ता झाला. त्याला शोधण्यासाठी त्याची आई फातिमा नफीसने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 

नजीबच्या आईची निदर्शने 
एक वर्षापासून मुलगा नजीबचा पत्ता न लागल्याने त्या विरोधात नजीबची आई फातिमा नफीस यांनी सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयाबाहेर निदर्शने केली. त्यांच्यासह जेएनयूमधील ३० विद्यार्थी निदर्शनांमध्ये सामील झाले. या दरम्यान दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
बातम्या आणखी आहेत...