आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेट न्यूट्रॅलिटीचे १० लाख समर्थक, सहापट वाढवावे लागतील दर : दूरसंचार कंपन्यांचे मत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - इंटरनेट तटस्थतेच्या (नेट न्यूट्रॅलिटी) वादविवादात दूरसंचार कंपन्यांनी भारती एअरटेलची बाजू घेतली आहे. या कंपन्यांच्या मते, आम्हाला स्काइप अथवा व्हॉट्सअॅप यांसारख्या नेट आधारित सेवा आणण्याची परवानगी द्यावी, अन्यथा अडचणी वाढतील. डाटाचे दर सहापट वाढवले तरच व्यवसाय करणे शक्य होईल. दरम्यान, इंटरनेट स्वातंत्र्याच्या बाजूने आतापर्यंत १० लाख लोकांनी ट्रायकडे पाठिंबा दर्शवला आहे.

भारती एअरटेलचे एम. डी. गोपाल विठ्ठल म्हणाले की, जर व्हॉइस सेवा देणाऱ्या दूरसंचार कंपन्यांसाठी नियम आहेत तर मग अॅप कंपन्यांसाठीही नियम असावेत. समान सेवेसाठी समान नियमांचा आमचा आग्रह आहे.

समान सेवा, समान नियम
सर्व संचार सेवांसाठी समान नियम हवेत, इंटरनेट कॉलिंगयुक्त अॅपवर लगाम घाला, असे सीओएआय या दूरसंचार कंपन्यांच्या संघटनेने म्हटले. आयएसपीएआयने‘समान सेवेसाठी समान नियम’ असावा असा सल्ला ट्रायला दिला आहे.