आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२६/११ चा मुंबई हल्ला, टाडा न्यायालयात हजर राहण्यास हेडली तयार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ला कटातील आरोपी आणि अमेरिकेत ३५ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेला लष्कर-ए- तोयबाचा अतिरेकी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुंबई न्यायालयात जबाब देणार असल्याचे त्याच्या मुखत्याराने सांगितले. मुंबईतील न्यायालयाने हेडलीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहण्याचे आदेश दिल्याचे मी वाचले आहे. हेडली मुंबई न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर होईल, असे त्याचे मुखत्यार जॉन टी. थेईस यांनी सांगितले.
हेडलीने मार्च २०१० मध्ये कबुलीजबाब लिहून दिला. त्यात त्याने जेव्हा केव्हा अमेरिकेच्या अॅटर्नी कार्यालयाकडून सांगितले जाईल तेव्हा कोणत्याही परदेशी न्यायालयात स्वत:, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अथवा लेखी जबाबामार्फत हजर होईन व प्रामाणिकपणे सहकार्य करीन असे म्हटले आहे.
तेव्हा प्रामाणिकपणे सहकार्य करण्याची तयारी हेडलीने दर्शवली आहे. मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचून तो अमलात आणल्याच्या गुन्ह्यात हेडलीला अमेरिकी न्यायालयाने दोषी ठरवून ३५ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. या हल्ल्यात १६६ जण ठार झाले होते. त्यात ६ अमेरिकी नागरिकांचा समावेश होता. आता हेडलीला मुंबई उच्च न्यायालयासमोर हजर राहण्याचे निर्देश द्यायचे की नाही, याचा निर्णय अमेरिकेच्या न्याय विभागाला घ्यायचा आहे. हेडलीने २००६ ते २००८ च्या दरम्यान मुंबईला भेट देऊन रेकी केली आणि ताज, ओबेरॉय हॉटेल, नरिमन हाऊससह महत्त्वाच्या स्थळांचे व्हिडिओ चित्रीकरण केले होते. त्याच्या रेकीमुळे लष्कर- ए- तोयबाचे १० दहशतवादी आणि त्यांच्या हँडलरला महत्त्वाची माहिती मिळाली होती.

मुंबईतील टाडा न्यायालयाने १९ नोव्हेंबर रोजी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात हेडलीला आरोपी करून घेतले आणि १० डिसेंबरपर्यंत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.