आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय मुलींच्या शिक्षणासाठी देणार 29 लाख युरो, स्वीडिश कंपनीच्या आयकेईए फाउंडेशनचा उपक्रम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली  - आयकेईए या स्वीडनमधील ‘होम फर्निशिंग’ कंपनीशी संबंधित आयकेईए फाउंडेशनने भारतातील मुलींच्या शिक्षणासाठी आणि सबलीकरणासाठी २९ लाख युरो एवढी रक्कम देण्याचे मान्य केले आहे. ही रक्कम लीला पूनावाला फाउंडेशनतर्फे देण्यात येईल.  
आयकेईए फाउंडेशनने यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘आयकेईए फाउंडेशनने २९ लाख युरो एवढी रक्कम देण्याचे मान्य केले अाहे. त्यामुळे मुली आपले शिक्षण तर पूर्ण करू शकतीलच, पण त्या स्वयंपूर्णही होतील. त्या समाजातील आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी सदस्यही बनू शकतील. या योजनेनुसार मुलींना शिष्यवृत्ती दिली जाईल तसेच त्याशिवाय कौशल्य विकास, नोकरीचा प्रवास आणि मुलींना प्रशिक्षण यांसारखे विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यासाठी निधीही मिळेल. या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे त्यांना प्रत्यक्ष व्यवहार करण्यासाठी मदत मिळेल शिवाय त्यांच्या ज्ञानातही भर पडेल.’  आयकेईए फाउंडेशन-लीला पूनावाला यांच्यातील भागीदारी २०११ मध्ये सुरू झाली. त्यानुसार आयकेईए फाउंडेशन निवडक मुलींना त्यांचे पदवी आणि पदवीपर्यंतचे शिक्षणसाठी मदत करते. 
 
तीन जिल्ह्यांत ४ हजार मुलींना मदत 
या कार्यक्रमानुसार, आयकेईए फाउंडेशन पुणे, अमरावती आणि वर्धा येथील ४००० मुलींना त्यांचा पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मदत करत आहे.
बातम्या आणखी आहेत...