आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून आठवड्यातून एकदा बचत खात्यांतून काढा 50 हजार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 नवी दिल्ली- नोटाबंदीनंतर बँकांतील बचत खात्यातून काढावयाच्या रकमेवर रिझर्व्ह बँकेने टाकलेली बंधने १३ मार्चपासून पूर्णपणे काढून घेण्यात येणार आहेत. त्यामुळे खातेदारांना यानंतर खात्यातून कितीही पैसे काढता येतील. दरम्यान, ८ फेब्रुवारी रोजी रिझर्व्ह बँकेने बचत खात्यातून काढल्या जाणाऱ्या रकमेवर घातलेली २४ हजार रुपयांची मर्यादा सोमवारपासून काढून घेण्यात आली असून आता खातेदार ५० हजार रुपये आठवड्याला काढू शकतील.
 
रोख रक्कम काढण्यासाठी ही मर्यादा घालून दिलेली असताना चालू खाते, ओव्हरड्राफ्ट आणि कॅश क्रेडिट खात्यांसाठी ही बंधने ३० जानेवारीपासूनच काढून घेण्यात आली होती. शिवाय, बँकांमध्ये व एटीएमसाठी बँकांना किती नव्या नोटा द्यावयाच्या याचीही मर्यादा निश्चित करण्यात आली होती.
 
नोटाबंदीनंतर विविध बँकांमध्ये निर्माण झालेला नव्या नोटांचा तुटवडा अाता कमी झालेला असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या ८ नोव्हेंबर राेजी नोटाबंदी लागू झाल्यानंतर १ हजार व ५०० रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या. यामुळे बाजारपेठांसह बँकांमध्येही रोख रकमेचा तुटवडा निर्माण झाला होता. या जुन्या नोटा बदलून देण्यासाठी सरकारने या सर्व बँकांमध्ये व्यवस्था केली.
 
मात्र, नव्या २ हजार रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात ही रक्कम बदलून दिली जात होती. त्यावरही केवळ २ हजार रुपये एका वेळी, अशी मर्यादा टाकण्यात आली होती. या काळात नोटा बदलून घेण्यासाठी देशभर सर्वच बँकांसमोर रांगा लागल्या. शिवाय यामुळे बाजारपेठांतही रोखतेचे प्रमाण कमी झाले होते.
 
2 लाखांच्या दागिने खरेदीवर 1 टक्का कर
१ एप्रिल २०१७ पासून २ लाख रुपयांहून अधिक रकमेचे रोख दागिने खरेदी केले तर १ टक्का कर (टीसीएस) द्यावा लागणार आहे. २०१७ च्या फायनान्स बिलामध्ये याची तरतूद करण्यात आलेली आहे. सध्या साधारण वस्तू आणि सेवांसाठी रोख रकमेने खरेदीची मर्यादा २ लाख रुपये आहे. दागिन्यांसाठी ५ लाख रुपयांची मर्यादा आहे.
बातम्या आणखी आहेत...