आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

59 काेब्रा कमांडाे फरार, न्यायालयीन चौकशीचे आदेश, बिहारला परतत होते प्रशिक्षणार्थी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
नवी दिल्ली - नक्षलविरोधी कोब्रा पथकातील तब्बल ५९ प्रशिक्षणार्थी कमांडो ड्यूटीवर हजर राहण्याच्या एक दिवस आधी एकत्रितरीत्या पसार झाल्याची अनपेक्षित घटना घडली. जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर येथील प्रशिक्षण केंद्रातून पाच आठवड्यांचे प्रशिक्षण घेतल्यानंतर संबंधित जवान पहिल्या पदनियुक्तीसाठी बिहारला दाखल होणार होते. रविवारी मुघलसराय स्थानकावर सर्व जण उतरणे अपेक्षित असताना ते पुढील प्रवासात फेरबदल करून घरी किंवा अज्ञातस्थळी गेल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

जवानांनी त्यांच्या कमांडरलाही आदल्या रात्री याबाबत कल्पना दिली नव्हती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. २०११ मध्ये भरती झालेल्या कॉन्स्टेबल स्तरावरील जवानांच्या बेशिस्त वर्तनाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. कमांडो बटालियन फॉर रिझोल्यूट अॅक्शन (कोब्रा) आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) अधिकाऱ्यांनुसार, जवान गयेतील कोब्रा युनिटमध्ये सोमवारी दाखल होणे अपेक्षित होते. यानंतर त्यांची नक्षलविरोधी अभियानात नियुक्ती केली जाणार होती. 

रेल्वेत जवानांसोबत असणाऱ्या काही हवालदारांनी त्यांच्याशी संपर्क साधला. काहींनी उद्या हजर होण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. 

अखेर सर्व जण एकत्र कसे पसार झाले याचा शोध घेतला जात आहे. बेपत्ता जवानांमध्ये बहुतांश उत्तर प्रदेश व बिहारचे आहेत. केंद्र सरकारने नक्षलविरोधी अभियान तसेच ईशान्य राज्यातील घुसखोरी रोखण्यासाठी २००९ मध्ये सीआरपीएफअंतर्गत कोब्रा पथकाची स्थापना केली.