आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीवर शिक्कामोर्तब?, उद्या घोषणेची शक्यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- केंद्र सरकार सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची घोषणा लवकरच करू शकते. त्यामुळे सुमारे एक कोटी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या वेतन- भत्ते पेन्शनमध्ये कमीत कमी २३.५५ टक्के वाढ होईल, असा अंदाज आहे. बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर निर्णय अपेक्षित आहे.

या वर्षीच्या अर्थसंकल्पात वेतन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी ७०,००० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. जानेवारी २०१६ पासून या शिफारशी लागू होतील. एकूण२३.५५ टक्के वाढीमध्ये भत्त्यांतील वाढही समाविष्ट आहे. मंत्रिमंडळ सचिव पी. के. सिन्हा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींवरील आपला अहवाल सरकारला सादर केला आहे. समितीच्या अहवालाच्या आधारावर अर्थमंत्रालय मंत्रिमंडळाच्या विचारार्थ एक टिपण तयार करत आहे. हे टिपण येत्या बुधवारी मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी ठेवले जाऊ शकते, असे अर्थ मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
सचिवांच्या समितीने वेतन आयोगाच्या शिफारशींवरील आपल्या अहवालाला अंतिम स्वरुप दिले आहे. आम्ही लवकरच त्या अहवालाच्या आधारे मंत्रिमंडळ टिपणाचा मसुदा जारी करू, असे वित्त सचिव अशोक लवासा यांनी सोमवारी सांगितले.

सरकारने जानेवारीमध्ये सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींवर विचार करण्यासाठी मंत्रिमंडळ सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकारप्राप्त समिती स्थापन केली होती. हा वेतन आयोग लागू झाल्यानंतर केंद्र सरकारचे सुमारे ५० लाख कर्मचारी आणि ५८ लाख पेन्शनधारकांची चांदी होईल.
पुढाल स्लाइड्सवर जाणून घ्या, शिफारशींची वैशिष्ट्ये...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तरURLम्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...