आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आधार’ने सुरू केली कथा, चित्रपट पाठवण्याची स्पर्धा; निकाल सोशल मीडियावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
नवी दिल्ली - आधारने देशातील सर्व लोकांसाठी एक स्पर्धा सुरू केली आहे. त्यात आधारशी संबंधित कथा आणि चित्रपट पाठवायचे आहेत. कथांसाठी ५ ते २० हजार रुपयांपर्यंतचे बक्षीस मिळेल. तर चित्रपटांसाठी २० ते ५० हजार रुपयांपर्यंतच्या बक्षिसाची घोषणा करण्यात आली आहे. ही स्पर्धा सोमवारपासून सुरू झाली आहे. तीत भाग घेण्यासाठी आधार कार्ड आणि आधार लिंक्ड बँक खाते असणे गरजेचे आहे. आधारच्या अधिकृत ट्विटर अकाउंटने ही माहिती दिली आहे.
 
‘आधार है तो आसानी आहे’ या नावाने ही स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. १० जुलैपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत ८ ऑगस्टच्या रात्री १२ वाजेपर्यंत फक्त ऑनलाइन प्रवेशिका पाठवता येऊ शकतील. आधारशी संबंधित २५० ते ५०० शब्दांपर्यंत या कथा, अनुभव मायक्रोसॉफ्ट वर्ड, पीडीएफ किंवा एखाद्या ब्लॉगवरून लिंकच्या फॉरमॅटमध्ये पाठवता येऊ शकतात. ते पाठवणाऱ्यांना आपला आधार क्रमांक, नाव, पत्ता आणि बँक खाते आधारशी जोडले असल्याची माहिती द्यावी लागेल. अव्वल ५ कथांना २० हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल. २० कथांना प्रत्येकी ५ हजार रुपयांचे बक्षीस मिळेल. निकाल ७ सप्टेंबरला सोशल मीडियावर जाहीर केला जाईल.
 
‘मेरी आधार फिल्म’ स्पर्धेत १० जुलै ते २३ ऑगस्टपर्यंत प्रवेशिका पाठवल्या जाऊ शकतील. ५ मिनिटांपर्यंतची हिंदी किंवा इंग्रजी माध्यमातील चित्रपट ऑनलाइन पाठवावा लागेल. हे चित्रपट एमपी ४, एव्हीआय, एफएलव्ही, डब्ल्यूएमव्ही, एमईजी किंवा एमओव्ही व्हिडिओ फॉरमॅटमध्ये असावेत. त्याचबरोबर ते फुल एचडी रिझोल्युशनमध्ये (१९२० बाय १०८०) असावेत. एक स्पर्धक फक्त एकच प्रवेशिका पाठवू शकेल. अव्वल ३ चित्रपटांना ५०-५० हजार रुपयांचे बक्षीस मिळेल. १० उत्कृष्ट चित्रपटांना प्रत्येकी २० हजार रुपये दिले जातील. बक्षिसांची घोषणा २२ सप्टेंबरला सोशल मीडियामार्फत होईल.
बातम्या आणखी आहेत...