आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली निवडणुकीत मोदींवरील थेट हल्ले टाळणार; आदमी पार्टीच्या भूमिकेत बदल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पंजाब व गोवा विधानसभा निवडणुकीतील अपयशामुळे आम आदमी पार्टीने आगामी दिल्ली महापालिका निवडणुकीसाठी भूमिकेत बदल करण्याचे ठरवले आहे. निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट हल्ले करण्यात येणार नाहीत. ही सकारात्मक प्रचार मोहीम राहील, असा निर्णय घेण्यात आला आहे.  

पक्षाच्या एका नेत्याने हे संकेत दिले आहेत. २०१५ मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम्ही सकारात्मक मोहीम राबवली होती. तशीच मोहीम आगामी प्रचारासाठीदेखील राबवली जाईल. तेव्हा आम्ही ४९ दिवसांत केलेल्या चांगल्या कामांची माहिती लोकांना दिली. त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला होता. त्यात यशही आले होते. पक्षाला ७० सदस्यीय दिल्ली निवडणुकीत ६७ जागी विजय मिळाला होता, असे पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याचे म्हणणे आहे. आगामी प्रचार मोहिमेत मोदी यांच्यावर थेट हल्ले केले जाणार नाहीत, ही भूमिका घेण्यामागील मोठे कारण म्हणजे उत्तर प्रदेश व उत्तराखंडमधील जनतेने भाजपच्या बाजूने दिलेला कौल होय. 
बातम्या आणखी आहेत...