आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अादर्श घाेटाळ्यात 2 माजी लष्करप्रमुखांची नावे, संरक्षण मंत्रालयाने केली कारवाईची शिफारस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन.सी. वीज - Divya Marathi
एन.सी. वीज
नवी दिल्ली - संरक्षण मंत्रालयाच्या उच्चस्तरीय चौकशीत आदर्श हाउसिंग सोसायटी घोटाळ्यात २ माजी लष्करप्रमुख व लष्करी अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. १९९ पानी अहवालात माजी लष्करप्रमुख एन.सी. वीज व जनरल दीपक कपूर, ३ माजी लेफ्टनंट जनरल व ४ मेजर जनरलशिवाय अन्य बड्या लष्करी अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची शिफारस केली आहे.
 
यातील बहुतांश अधिकाऱ्यांना आदर्शमध्ये सदनिका मिळाल्या होत्या. अहवालानुसार, जनरल वीज यांनी चुकीच्या पद्धतीने जमीन वाटपासाठी मदत केली आणि चुकीचे कामे करणाऱ्यांचा बचाव केला. असे असले तरी जनरल कपूर यांचा प्रकरणाशी संबंधित निर्णयाशी थेट संबंध नव्हता. वरिष्ठ अधिकारी रोल मॉडेल असतात त्यामुळे त्यांनी कामातून उदाहरण समाेर ठेवायला हवे. मात्र, त्यांचा चुकीच्या कामातील सहभाग गंभीर गुन्हा आहे. अहवालात माजी नौदल प्रमुख अॅडमिरल माधवेंद्र सिंह व व्हाइस अॅडमिरल मदनजित सिंग यांना ‘लाभ घेणारे’ ठरवले आहे. 
 
त्यांनाही त्यात सदनिका मिळाली होती. मात्र, घोटाळ्यात त्यांची भूमिका नव्हती. माजी आयएएस राजन कटोच व निवृत्त लेफ्टनंट जनरल रवी ठोगडे यांनी प्रकरणाची चौकशी केली. असे असले तरी माजी लष्करी अधिकाऱ्यांविरुद्ध आर्मी अॅक्टनुसार कारवाई होऊ शकत नाही. सर्व निवृत्त होऊन ३ वर्षापेक्षा जास्त काळ झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...