आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटाबंदीनंतरही 7% विकास दर चकित करणारा : फिच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - चालू आर्थिक वर्षात भारताचा विकास दर ७.१ टक्के राहणार असल्याचा अंदाज जागतिक गुणांकन संस्था फिचने व्यक्त केला आहे. तर एक एप्रिलपासून सुरू होत असलेल्या आर्थिक वर्ष २०१७-१८ दरम्यान ७.७ टक्के विकास दर राहण्याची शक्यताही फिचने व्यक्त केली आहे. अमेरिकेतील या जागतिक गुणांकन संस्थेने ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत नोटाबंदीनंतरही ७ टक्के विकास दर हा चकित करणारा असल्याचे मत मांडले आहे.  

सरकारने केलेल्या जीडीपी आकडेवारीमध्ये डिसेंबर तिमाहीत ७ टक्के विकास दर राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. सरकारच्या वतीने व्यक्त करण्यात आलेल्या अहवालानुसार नोटाबंदीनंतर कृषी विभागात झालेल्या चांगल्या वाढीमुळे विकास दराला मदत मिळाली आहे. असे असले तरी अंतिम जीडीपी आकडेवारी सात टक्क्यांच्याही खाली राहणार असल्याचा दावा काही अर्थतज्ज्ञांनी केला आहे.  
बातम्या आणखी आहेत...