आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वाधिक महिला पाेलिसांची संख्या राज्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशभरात एकूण १ लाख २३ हजार महिला पाेलिस सेवेत अाहेत. यात सर्वाधिक महिला पाेलिस या महाराष्ट्रात असून त्यांची संख्या २१ हजार २४९ एवढी अाहे. ६ पाेलिसांमध्ये एक महिला पाेलिस असल्याची माहिती गृह मंत्रालयाने त्यांच्या अहवालात नमूद केली.  
 
महाराष्ट्रात महिला पाेलिसांची संख्या अधिक असली तरी हे राज्य एकही महिला पाेलिस ठाणे निर्माण करू शकले नाही. २०१६ मध्ये देशभरात ५८६ महिला पाेलिस ठाण्यांना मंजुरी देण्यात अाली हाेती. त्यात २०० पेक्षा अधिक तामिळनाडू, उत्तर प्रदेशात ७१, बिहार व राजस्थानमध्ये प्रत्येकी ४०, गुजरातमध्ये ३२, तर प. बंगालमध्ये ३० ठाण्यांचा समावेश हाेता. 
 
महाराष्ट्रात महिला पाेलिसांची पदनिहाय विभागणी केल्यास १८,४२४ काॅन्स्टेबल, ११९७ हेड काॅन्स्टेबल, २७१ सहायक उपनिरीक्षक, १०६२ उपनिरीक्षक, २२० निरीक्षक, ४० सहायक अायुक्त/ अधीक्षक, ३१ अायुक्त, १ अायजी, २ अतिरिक्त महासंचालक अाणि १ महासंचालक या वर्गवारीतील अाहेत. 
 
महाराष्ट्रानंतर तामिळनाडू, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली अाणि प. बंगालचा क्रमांक लागताे.  बिहार, मध्य प्रदेश, तामिळनाडू, तेलंगण, झारखंड, अाेडिशा, गुजरात या राज्यांत  महिलांसाठी ४ ते ३८ टक्के पदे अारक्षित ठेवण्यात अाली अाहेत.   
बातम्या आणखी आहेत...