आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM SPL: तीन वर्षांपूर्वी आजच्या दिवशी झाले अध्यक्ष, आता तीन वर्षांनंतर खासदार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मंगळवारी राज्यसभेचे खासदार बनले. ते पहिल्यांदा संसदेत दाखल झाले. (आैपचारिक घोषणा बाकी)  खासदार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी अर्थात ९ ऑगस्ट रोजी भाजप अध्यक्षपदाची सूत्रे घेऊन त्यांना तीन वर्षे पूर्ण होतील. तेव्हाही ८ ऑगस्ट रोजी त्यांचे अध्यक्ष होणे जवळपास निश्चित झाले होते. शहा यांनी तीन वर्षांत भाजपला जगातील सर्वात मोठा पक्ष बनवले. भाजपला शिखरावर नेऊन ठेवण्याचे काम शहा-मोदी यांच्या जोडीने केले आहे. देशातील १३ राज्यांत भाजप सत्तेवर आहे. पाच राज्यांत सहकारी पक्षांची सत्ता आहे. अध्यक्ष बनल्यानंतर शहा यांनी सरकारची ५ वर्षे पूर्ण हाेण्याच्या अगोदर राज्यसभेत बहुमताचे उद्दिष्ट ठेवलेे. छोट्या राज्यांत इशान्येकडील सात राज्यांसह जम्मू-काश्मीरचाही समावेश होता. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, बिहारमध्ये पक्षाला बळकटी दिली. 

आसाम, मणिपूर, जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच भाजपचे सरकार स्थापन झाले. केरळमध्ये भाजपने खाते उघडले. तेव्हा शहा म्हणाले होते, ‘सरकार चांगले वाटणार नाही. मात्र, ते नोटबंदीसारखे चांगले निर्णय नक्कीच घेईल, हे माझे मूळ वाक्य आहे. ’

दररोज ५४१ किमीचा प्रवास, ५०० जाहीर सभा 
अमित शहा यांनी तीन वर्षांत देशातील प्रत्येक राज्याचा दौरा केला. त्यातही रस्ते वाहतुकीचा वापर जास्त केला. दररोज सरासरी ५४१ किमीचा प्रवास त्यांनी केला. तीन वर्षांत ५०० हून अधिक सभा घेतल्या. देशभरात ११० दिवसांत सतत दौरे करणारे ते भाजपचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.

पक्षवाढीसाठी वेगळे प्रयत्न
- शहा यांनी कार्यकर्ता आणि पक्षाचा मतांचा टक्का वाढवण्यासाठी पहिल्यांदा आेबीसी माेर्चाची बांधणी केली.
- जनसंवाद नावाने कार्यक्रम सुरू केला. कोणत्याही कार्यकर्त्यास पक्ष नेत्यांची विनाअपॉइंटमेंट भेट घेण्याची सोय केली.
- आठ लाखांहून अधिक घरांजवळ जिल्ह्यात प्रशिक्षणाची सुविधा दिली. त्यामुळे बूथ पातळीपर्यंत समर्पित कार्यकर्ता मिळणे सुरू झाले.
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धर्तीवर पूर्णवेळ कार्यकर्त्याची संकल्पना. त्याअंतर्गत ४ लाख कार्यकर्त्यांचा समावेश.
- पूर्णवेळ चार कार्यकर्त्यांनी पंधरा दिवस, सहा महिने आणि एक वर्षासाठी घरापासून अज्ञात ठिकाणी राहून पक्षासाठी रात्रंदिवस काम करण्याचा निर्णय घेतला.

तीन निर्णयांमुळे पक्षाच्या लोकप्रियतेत वाढ
- जनतेच्या जवळ येण्यास सांगितले- मोठ्या नेत्यांनी हवाई दौऱ्याऐवजी रेल्वे किंवा रस्ते मार्गास प्राधान्य द्यावे.
- रात्री मुक्काम करायचा झाल्यास हॉटेलऐवजी शोषित किंवा वंचित वर्गातील कार्यकर्त्याकडे मुक्कामी राहण्याचा नियम बनवला.
- देशातील प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्यांना घराजवळच प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली.
बातम्या आणखी आहेत...