आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुराग ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागितली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली  - भारतीय क्रिकेट नियामक  मंडळाचे (बीसीसीआय) माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयाची विनाअट माफी मागितली. सर्वोच्च न्यायालयाने ठाकूर यांना अवमानप्रकरणी दोषी ठरवले होते. यानंतर ठाकूर यांनी न्यायालयाची माफी मागितली. मागच्या शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयचे माजी प्रमुख ठाकूर यांना न्यायालयाच्या अवमानप्रकरणी विनाअट माफी मागण्यास सांगितले होते.
 
न्यायालयाने आदेश देत १४ जुलै रोजी वैयक्तिकरीत्या हजर राहण्यास सांगितले हाेते. यानंतर ठाकूर यांनी गुरुवारी माफी मागितली. बीसीसीअायचे अध्यक्ष असताना ठाकूर लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्यासाठी टाळाटाळ करत होते. यानंतर न्यायालयाने त्यांना अध्यक्ष पदावरून दूर केले. याशिवाय खोटी साक्ष दिल्याप्रकरणी न्यायालयाने मागच्या सुनावणीत ठाकूर यांना फटकारत विनाअट माफी मागण्यास सांगितले होते.
बातम्या आणखी आहेत...