आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपोलोतील किडनी रॅकेट प्रकरण: पोलिसांची पथके जाणार, नागपूर, जयपूर, जम्मूला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राजधानीच्या अपोलो रुग्णालयातील किडनी रॅकेटप्रकरणी एका ग्राहीला अटक केल्यानंतर तसेच या प्रकरणातील चौघांची ओळख पटल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यासाठी दिल्ली पोलिसांची पथके आता नागपूर, जयपूर आणि जम्मूला जाणार आहेत.

नागपूर येथील एका व्यावसायिकाने किडनी विकत घेतली आहे. कुटुंबातील तीन व्यक्तींच्या प्रत्यारोपणासाठी त्याने किडनी विकत घेतल्याने तो आर्थिक अडचणीत असल्याचे समजते. जम्मू आणि जयपूर येथील दोन लघु व्यावसायिकांनीही किडनी विकत घेतली आहे, अशी माहिती तपास पथकातील एका अधिकाऱ्याने दिली.

गाझियाबाद येथील आशुतोष या २२ वर्षीय तरुणाला गेल्या गुरुवारी अटक करण्यात आली. तो डीजेबीमधील कनिष्ठ अभियंत्याचा मुलगा आहे. किडनी घेणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीने प्रत्यारोपणापूर्वी बनावट कागदपत्रे देऊन गाझियाबादचे असल्याचे दाखवले होते.
बातम्या आणखी आहेत...