आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयएसआयला जमले नाही ते भाजपने तीन वर्षांत केले; केजरीवाल यांची टीका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आम आदमी पक्षाच्या स्थापनेस पाच वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रामलीला मैदानावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली. आपचे राष्ट्रीय संयोजक केजरीवाल यांनी देशभरातून गोळा झालेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. केजरीवाल म्हणाले, ७० वर्षांत पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयला देशाचे तुकडे करणे जमले नाही, तेच कार्य भारतीय जनता पक्षाने गेल्या तीन वर्षांत करून दाखवले. देश एक नाजूक काळातून जात आहे. हिंदू-मुस्लिमांत भांडणे लावून देशाचे विभाजन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हिंदू-मुस्लिमांमध्ये भांडणे लावून भारताचे विभाजन करणे हाच पाकिस्तानचा उद्देश आहे.  देशात हिंदू व मुस्लिमांचे विभाजन करणारे आयएसआयचे हस्तक आहेत. देशभक्तींचा बुरखा पांघरणारे देशद्रोही आहेत, असा आरोप त्यांनी केला.  


रामलीला मैदानावरून केजरीवाल यांनी गुजराती जनतेला संदेश दिला. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्याची क्षमता असलेल्या पक्षालाच गुजराती जनतेने मतदान करावे. जर आम आदमी पार्टी कोठे जिंकण्याची शक्यता वाटत असेल तेथे आमच्या उमेदवारास मतदान करावे. परंतु भारतीय जनता पक्षाला मतदान करू नका. गुजरातच्या जनतेने भाजपला धडा शिकवावा, असे आवाहन केजरीवाल यांनी केले. 

बातम्या आणखी आहेत...