आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षाच्या पहिल्याच दिवशी दोन मुख्यमंत्र्यांवर जोडेफेक, केजरीवाल यांच्या दिशेने युवकाने भिरकावला बूट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहतक/रांची- नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी देशात दोन मुख्यमंत्र्यांवर जोडेफेक करण्यात आली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हरियाणातील रोहतकमध्ये बूट फेकण्यात आला. दुसरीकडे झारखंडच्या खरसावांमध्ये मुख्यमंत्री रघुवर दास यांच्यावरही बूट फेकण्यात आला. केजरीवाल रविवारी रोहतकमध्ये नोटबंदीच्या विरोधातील सभेत बोलत होते. त्याच वेळी विकास नावाच्या युवकाने केजरीवाल यांच्याकडे बूट फेकला. केजरीवाल यांना बूट लागला नाही. विकास एसवायएलच्या मुद्द्यावर विरोध दर्शवत होता. आपच्या समर्थकांनी नंतर विकासला जोरदार मारहाण केली.
बातम्या आणखी आहेत...