आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनोवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले, नॅशनल रजिस्टर ऑफ सिटझन्सवरील टिप्पणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्सबाबत (एनआरसी) आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या वक्तव्यामुळे नाराज झालेल्या सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी त्यांना फटकारले. एनसीआरचा मुसदा ३१ डिसेंबरपर्यंत प्रकाशित केला जाईल, असे सोनोवाल यांनी म्हटले होते.
 
न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने म्हटले आहे की, “सर्वोच्च न्यायालयाद्वारे नियुक्त समितीच्या निगराणीत एनआरसीचा मसुदा तयार होत आहे, मग अशा स्थितीत कुठलीही संस्था किंवा व्यक्ती अशी टिप्पणी करू शकत नाही.” एनसीआरच्या प्रकाशनाची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०१९ आहे. खंडपीठाने म्हटले आहे की, “एनआरसीचा मसुदा मार्च २०१८ पर्यंत प्रकाशित होईल, असे तुम्ही आधी म्हटले होते. आता हा मसुदा डिसेंबर २०१७ पर्यंत तयार होईल, असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले असल्याची माहिती आमच्याकडे आहे. तुम्ही काम करत असाल तर आम्ही मागे हटतो.”
बातम्या आणखी आहेत...