आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद-जालना-जळगाव महामार्गास मंजुरी : नितीन गडकरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी महाराष्ट्रातील अामदार, खासदार व प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राज्यातील ३० हजार कोटींच्या प्रकल्पांचा आढावा घेतला.  यात कल्याण-ठाणे-मुंबई जलमार्ग, औरंगाबाद-जालना- जळगाव महामार्गाला मंजुरी देण्यात अाली. तसेच जालना- चिखली महामार्ग चाैपदरीकरणाच्या कामालाही हिरवा कंदिल दाखवण्यात अाला. 
 
या बैठकीसाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मदन येरावार,  कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक, अकोल्याचे भाजप खासदार संजय धोत्रे, औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरेही हजर होते. अजिंठ्याकडे जाणाऱ्या औरंगाबाद-जालना-जळगाव महामार्गावर काही ठिकाणी चौपदरीकरण शक्य, तर काही ठिकाणी ते होऊ शकत नाही, याबाबत बैठकीत चर्चा झाली. या महामार्गाच्या बांधकामास मंजुरी देण्यात अाली. जालना-चिखली महामार्गाच्या चौपदरीकरणाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचा डीपीआर मान्य करून कामाला सुरुवात हाेणार असल्याचे गडकरी म्हणाले. कल्याण-ठाणे-मुंबई अशा जलवाहतुकीचा प्रस्तावही मान्य करण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...