आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांची मोदींबरोबर मेट्रो सफर, अक्षरधाम मंदिरात घेतले दर्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॅल्कम टर्नबुल यांच्याबरोबर मेट्रोमधून प्रवास केला. मंडी हाऊसपासून अक्षरधामपर्यंत दोघे मेट्रोतून गेले. यादरम्यान त्यांनी मेट्रोत सेल्फीही घेतली. विशेष म्हणजे यावेळी सामान्य जनतेसाठी मेट्रो प्रवास सुरू ठेवण्यात आला होता. त्यापूर्वी टर्नबुल यांनी मोदींचे कौतुक करत, त्यांच्या नेतृत्त्वात भारत विकासाच्या मार्गावर आगेकूच करत असल्याचे वक्तव्य केले होते. 
 
दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत टर्नबुल..
- टर्नबुल दोन दिवसांच्या दौऱ्यावर भारतात आले आहेत. सकाळी मोदींनी त्यांच्याबरोबर संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
- मोदींनी क्रिकेट डिप्लोमसीचा वापर करत भारताचा विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव्हन स्मिथ हे तरुण क्रिकेटर्सना प्रेरणा देत आहेत, असे म्हटले होते. 
- दोन्ही देशांत 6 सामंजस्य करार करण्यात आले. त्यात एक दहशतवाद आणि ऑर्गनाइज्ड क्राईमच्या विरोधात आहे. 
- टर्नबुल यांच्या दौऱ्याने दोन्ही देशांतील संबंध सुधारतील असे मोदी म्हणाले. तर टर्नबुल यांनी भारतीय विद्यार्थ्यांना चांगल्या संधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, टर्नबुल यांच्या भारत दौऱ्याचे फोटो, अखेरच्या स्लाइडवर पाहा Video
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
 
बातम्या आणखी आहेत...