आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य विमा काढण्याचे सर्व बँकांना आदेश १० लाख बँक कर्मचारी ३ लाख निवृत्तांचा विमा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशातील सर्व बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांचा आरोग्य विमा काढला जाणार आहे. सरकारी विमा कंपन्या इंडियन बँक असोसिएशनच्या (आयबीए) माध्यमातून मेडिक्लेम पॉलिसी जारी करतील. ऑगस्ट अखेरपर्यंत त्या जारी होण्याची आशा आहे. १० लाख कर्मचारी आणि तीन लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना योजनेचा फायदा होणार आहे.

या विमा पॉलिसीचा प्रीमियम बँकाच भरणार आहेत. कर्मचाऱ्यांना ३ लाख रुपयांची आरोग्य विमा सुरक्षा मिळेल. त्याचा प्रीमियम पाच हजार रुपये असेल. बँक अधिकाऱ्यांची विमा सुरक्षा चार लाख रुपये व प्रीमियम ६ हजार रुपये असेल.

बँक कर्मचारी संघटना आणि आयबीए यांच्यात २५ मे रोजी नवा वेतन करार झाला होता. मेडिक्लेम पॉलिसी त्याचाच एक भाग आहे. आयबीएच्या सर्व ४३ सदस्य बँकांत योजना लागू होईल. यात २५ सरकारी, ११ जुन्या खासगी बँका आणि ७ विदेशी बँकांचा समावेश आहे.
न्यू इंडिया इन्शुरन्सचे सीएमडी जी. श्रीनिवासन यांनी सांगितले की, पॉलिसीच्या अटीशर्तींबाबत आयबीएसोबत चर्चा सुरू आहे. बँकांकडून आपल्या कर्मचाऱ्यांना या प्रकारचा आरोग्य विमा देण्याची ही पहिलीच वेळ आहे. श्रीनिवासन हे सामान्य विमा कंपन्यांच्या संघटनेचे चेअरमनही आहेत.
बातम्या आणखी आहेत...