आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिबिल स्कोअरच्या आधारे व्याजदर निश्चित करणारी बँक ऑफ बडोदा ठरली देशातील पहिली बँक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - तुमच्या कर्जावर किती व्याज लागेल हे पत गुणांकनावर (क्रेडिट स्कोअर) ठरेल. स्कोअर चांगला असेल तर व्याजदर कमी असेल. स्कोअर कमी असेल म्हणजे कर्ज महागात पडेल. देशभरात हा स्कोअर क्रेडिट इन्फर्मेेशन ब्युरो ऑफ इंडिया म्हणजे सिबिल देतो. जुन्या कर्जाचा हफ्ता व्यवस्थित भरला की नाही यावर स्कोअर ठरताे. सध्या बँक ऑफ बडोदाने सिबिलच्या क्रेडिट स्कोअरला व्याजदराशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच दुसऱ्या बँकाही ही पद्धती अवलंबू शकतात.

बँक आॅफ बडोदानुसार, सिबिल स्कोअर ७६० पेक्षा जास्त असेल तर गृहकर्जावर ८.३५ % व्याज घेतले जाईल. सिबिल स्कोअर ७२५ ते ७५९ दरम्यान असेल तर व्याजदर ८.८५ % असेल. स्कोअर ७२४ पेक्षा कमी असेल तर ९.३५ % व्याज द्यावे लागेल. पहिल्यांदा कर्ज घेणाऱ्यांचा कोणताही सिबिल डाटा असत नाही. बँक त्यांना ८.८५ % व्याजावर गृहकर्ज देते. बँक ऑफ बडोदाचे मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट(एमसीएलआर) उर्वरित सर्व बँकांपेक्षा कमी (८.३५%) आहे. टॉप रेटेड ग्राहकांसाठी याच दराने कर्ज दिले जाईल. त्यांच्यापासून काही स्प्रेड घेतले जाणार नाही. किमान व्याजावर घेतला जाणारा दर म्हणजे स्प्रेड असतो. बँक ग्राहकाच्या जोखमीनुसार तो निश्चित होतो. जोखीम जास्त असेल तर स्प्रेडही जास्त असतो. एसबीआयचा एमसीएलआर ८.६५% व आयसीआयसीआय बँकेचा ८.७० % आहे. ७५० पेक्षा जास्त सिबिल स्कोअर कर्जासाठी चांगला मानला जातो. मात्र, तुम्ही एखादे कर्ज ‘सेटलमेंट’मध्ये फेडले असेल तर स्कोअर जास्त असूनही कर्ज मिळताना अडचण येऊ शकते.

 सेटलमेंटचा अर्थ आपल्या क्रेडिट कार्डचे बिल किंवा इएमआय भरलेला नसणे. रक्कम वाढल्यानंतर एका तडजोडीअंती काही रक्कम भरून कर्ज खाते बंद केले जाते.
 
३ पद्धतींनी क्रेडिट स्कोअरमध्ये सुधारणा
१) ईएमआय योग्य वेळेत भरा. तारीख चुकल्यास स्कोअर घसरतो.
२ )क्रेडिट कार्डाचा वापर आवश्यकता असेल तरच करा. जास्त वापरामुळेही गुण कमी होतात. तुम्ही जास्त खर्चिक आहात यातून दिसते.
३ )क्रेडिट कार्डाने खरेदी केल्यास बिले वेळेवर भरा. अन्यथा तुमची रेटिंग कमी होईल.