आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्रीजी राजधर्म पाळा, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या- भाजप MP वीरेंद्रसिंग मस्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या आणि उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांना जाहीर झालेल्या कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अशी कर्जमाफी जाहीर करावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारवर दबाव वाढत चालला आहे. विरोधी पक्षांनी हा मुद्दा लावून धरलेला असताना आता भाजपमधूनच ही मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार वीरेंद्रसिंग मस्त यांनी ‘शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन राजधर्म पाळा’, असे आवाहन करून फडणवीस सरकारला घरचा आहेर दिला आहे.

‘शेतकऱ्यांनी अात्महत्या करू नये म्हणून तुम्ही कायमस्वरूपी उपाय शाेधता अाहात ही चांगली बाब अाहे;  परंतु अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करणे हा राजधर्म अाहे. तुम्ही ताे पाळलाच पाहिजे,’ अशा शब्दांत मस्त यांनी फडणवीसांना राजधर्म शिकवला आहे. वीरेंद्रसिंग शेतकरी नेते अाहेत. दहाव्या, बाराव्या अाणि अाता साेळाव्या लाेकसभेचे ते सदस्य अाहेत. उत्तर प्रदेशातील भदाेहीतून निवडून येणारे वीरेंद्रसिंग संसदेत शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी नेहमी केंद्राला वेठीस धरत असतात. 
 
हे उपकार नाहीत, शेतकऱ्यांचा अधिकारच...
कर्जमाफी देऊन सरकार उपकार करत नाही. ताे त्यांचा अधिकार अाहे.  ४२ टक्के शेतकरी देशातील महसुलात सर्वाधिक भर टाकतात. नैसर्गिक संकटात सरकारने मदत करावी म्हणूनच महसूल देत असतात. देशात सर्वाधिक ठेवी यांच्याच असतात. कर्ज घेतले तर त्याची सर्वाधिक परतफेडही शेतकऱ्यांकडूनच हाेते. कर्ज बुडवणे ही त्यांची मानसिकता नसते. उलट कर्ज कसे फेडता येईल, याची चिंता असते. शेवटी स्वाभीमानाने जगता येत नाही म्हणून अात्महत्येचा मार्ग ते स्वीकारतात, असे वीरेंद्रसिंग म्हणाले.
 
बँकांना मानवी संवेदना काय कळणार?
शेतकरी अडचणीत असताना त्यांना मदत करायची नाही तर कुणाला? सरकारला या मानवी संवेदना जाेपासाव्या लागतील. ऊर्जित पटेल म्हणतात की शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तर करदाते नाराज हाेतील. अर्थव्यवस्थेत ज्यांचा सर्वात माेठा वाटा अाहे त्या शेतकऱ्यांबाबत नकारात्मक िवचार याेग्य नाहीत. बँक ही सरकारची व्यावसायिक संस्था अाहे. त्यांना केवळ नफा व ताेटा पाहावयाचा असतो. मानवी संवेदनांशी त्यांना देणेघेणे नसते, असेही वीरेंद्रसिंग सिंग म्हणाले.
 
अगोदर मदत करा, मग उपाय शोधा
महाराष्ट्र, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, काश्मीर, प. बंगाल, अाेरिसा या राज्यांतही शेतकरी नैसर्गिक अापत्तींचा सामना करत अाहेत. या राज्य सरकारांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाय नक्कीच शाेधावेत, परंतु अाधी तत्काळ मदत करून राजधर्म पाळावा. केंद्राने यात मदत करावी, अशी अपेक्षा सिंग यांनी व्यक्त केली. सोमवारी भाजपच्या िकसान मोर्चाचा अध्यक्ष या नात्याने याबाबत पंतप्रधानांना पत्र लिहिणार असल्याचेही खा. वीरेंद्रसिंग यांनी सांगितले.
 
सरसकट कर्जमाफी नको : एमआयएम
औरंगाबाद - ज्यांना खरी गरज आहे त्यांनाच कर्जमाफी द्यायला हवी. निवडणुकीच्या काळात कर्जमाफी देण्याची परंपराच चुकीची आहे, असे एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे. शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी एसबीआयच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत मांडलेल्या भूमिकेचे समर्थन केले. राज्यात सरसकट कर्जमाफी देण्याच्या भूमिकेला एमआयएमचा विरोध असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
ऊर्जित पटेल अाणि अरुंधती यांचा निषेध
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल अाणि स्टेट बँक अाॅफ इंिडयाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ नये, अशी भूमिका मांडताना यामुळे शेतकऱ्यांना तशीच सवय लागेल, असे मत मांडले होते. शिवाय भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचा िवपरीत परिणाम होत असल्याचे विधान केले हाेते. या दोघांच्याही विधानाचा वीरेंद्रसिंग यांनी निषेध केला.
 
उत्तर प्रदेशातील कर्जमाफीचे स्वागत
उत्तर प्रदेशमध्ये राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिल्याबद्दल 
त्यांनी स्वागत केले. याच प्रकारे महाराष्ट्रात टंचाईमुळे अडचणीत येणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देणे कसे गरजेचे आहे, ते समजावून सांगितले.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...