आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्यांमुळे तामिळनाडूचे नुकसान झाले : सुब्रमण्यम स्वामी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - चित्रपट कलाकार राजकारणात प्रवेश करतात. त्यामुळे तामिळनाडूचे नुकसान झाले आहे, अशी टीका भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी शनिवारी केली. अभिनेता रजनीकांत यांच्या प्रवेशाबाबतची चर्चा असतानाच स्वामी यांंनी हा टोला लगावला.   
 
रजनीकांत राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू असतानाच स्वामी यांनी हे वक्तव्य केले आहे. तामिळनाडूचे नुकसान चित्रपट कलाकारांमुळे झाले आहे. त्यांचे संवादही इतरांनी लिहिलेले असतात. त्यांच्याकडे काळा पैसा असतो. त्यांची परदेशात बँक खातीही असतात. त्यामुळेच तामिळनाडू भ्रष्ट राज्यांत समाविष्ट आहे, असा दावा स्वामी यांनी केला आहे. रजनीकांत राजकारण प्रवेश करणार असल्याची चर्चा अाहे. त्यावर स्वामी म्हणाले, हा त्यांचा चुकीचा निर्णय ठरेल. रजनीकांत राजकारणाच्या दृष्टीने अयोग्य आणि अडाणी आहेत. पक्ष तसेच विविध नेत्यांशी आपली चर्चा सुरू आहे,  असे अलीकडेच रजनीकांत यांनी म्हटले होते. सर्व काही निश्चित होईपर्यंत आपण कोणतीही गोष्ट जाहीर करणार नाही. त्याचबरोबर समर्थकांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले होते. तामिळनाडूत एमजी रामचंद्रन व जयललिता यांनी राजकारणात प्रवेश केला होता. 
बातम्या आणखी आहेत...