आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाच्या पायांच्या वेदना कमी करण्यासाठी आईने केली मसाज, 23 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
नवी दिल्ली - शरीराचा एखादा भाग बऱ्याच दिवसांपासून दुखत असेल आणि मालीश करून घ्यायची असेल तर थोडी सावधगिरी बाळगा. कारण ही मालीश तुम्हाला थेट मृत्यूच्या दाढेतही नेऊ शकते. मालीशमुळे श्वास कोंडून २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. 

या तरुणाच्या पोटऱ्यांत थिजलेल्या रक्ताची गाठ (ब्लड क्लॉट) होता. त्याला डीपी व्हेन थ्रोम्बोसिस (डीव्हीटी) असे म्हणतात. पाय दुखू लागल्यावर त्याच्या आईने मसाज द्यायला सुरुवात केली. इतक्यात त्याचा श्वास कोंडून मृत्यू झाला. एम्समध्ये तरुणाचे पोस्टमाॅर्टेम करण्यात आले. त्यात समजले की, त्याच्या पायाच्या शिरेमध्ये ५ सेंटिमीटर लांब आणि १ सेंटिमीटर रुंद ब्लड क्लॉट होता. मालीश केल्यामुळे तो पायातून मोकळा झाला व रक्तवाहिनीतून थेट फुप्फुसांत गेला. त्यातच श्वास कांेडून तरुणाचा मृत्यू झाला. गतवर्षीची  ही घटना मेडिको - लीगल जर्नल मासिकाच्या ताज्या अंकात प्रकाशित झाली आहे.
 
नेमके काय घडले 
 दिल्लीत राहणाऱ्या तरुणाला गतवर्षी १५ सप्टेंबर रोजी बॅडमिंटन खेळताना डाव्या घोट्याला दुखापत झाली होती. डॉक्टरांनी त्यावर प्लॅस्टर केले. १७ ऑक्टोबरला प्लॅस्टर काढल्यानंतर तो पुन्हा सामान्यपणे चालू-फिरू लागला. प्रत्यक्षात या दुखापतीमुळे त्याच्या पायाच्या शिरेत रक्ताची गाठ जमा झाली होती. मालीशचा प्रयोग त्या तरुणाच्या जिवावर बेतला. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...