आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

US मधील भारतीयांवरील हल्ल्याबाबत सरकार गंभीर, पुढील आठवड्यात भूमिका मांडणार : राजनाथ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अर्थसंकल्पीय अधिवेशनात राजनाथसिंह लखनऊमध्ये आयएसच्या संशयिताचे एन्काऊंटर आणि मध्यप्रदेशातील शाजापूर येथील रेल्वेतील स्फोटाबाबत म्हणणे मांडू शकतात. (फाइल) - Divya Marathi
अर्थसंकल्पीय अधिवेशनात राजनाथसिंह लखनऊमध्ये आयएसच्या संशयिताचे एन्काऊंटर आणि मध्यप्रदेशातील शाजापूर येथील रेल्वेतील स्फोटाबाबत म्हणणे मांडू शकतात. (फाइल)
नवी दिल्ली - संसदेच्या बजेट सेशनच्या दुसऱ्या भागाला गुरुवारपासून सुरुवात झाली. त्यापूर्वी पंतप्रधानांनी अपेक्षा व्यक्त केली आहे की, या सत्रात चर्चेची पातळी उंचावलेली असेल. तसेच जीएसटीचा मार्ग मोकळा होईल, असेही ते म्हणाले. या सत्रात लखनऊतील आयएसच्या संशयिताचे एन्काउंटर, रामजस कॉलेजचा वाद आणि जीएसटी हे सर्वात महत्त्वाचे मुद्दे असतील. अमेरिकेत भारतीयांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या मुद्द्यावर सरकार गंभीर असून याबाबत पुढील आठवड्यात संसदेत बोलणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. अमेरिका में भारतीय पर हो रहे हमलों के मुद्दे पर राजनाथ ने कहा कि सरकार से इस मुद्दे को गंभीरता से लिया है। सरकार अगले हफ्ते इस पर बयान देगी। 

UPDATES 
-राजनाथ म्हणाले सरकार अमेरिकेत भारतीयांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत गंभीर आहे. या मुद्द्यावर भारत सरकारकडून लोकसभेत पुढील आठवड्यात म्हणणे मांडले जाईल.
- राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. 
- अमेरिकेत भारतीयांवर होणाऱ्या हल्ल्याबाबत विरोधकांनी संसदेत घोषणाबाजी केली. 
- संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात, दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ।
- अर्थसंकल्पावर सखोल चर्चा होईल असे पंतप्रधान संसदेबाहेर म्हणाले. जीएसटीचा मार्ग मोकळा होईल, आणि चर्चेचा स्तर उंचावेल असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले. 
- अमेरिकेत भारतीयांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या विरोधात तृणमूलने गांधीजींच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले. 
- अनंत कुमार म्हणाले, फायनान्स, मॅटर्निटी आणि इतर अनेक महत्त्वाच्या विधेयकांवर यावेळी चर्चा होणे अपेक्षित आहे. त्यामुळे सर्वांनी संसदेचे कामकाज चालवण्यासाठी सहकार्य करावे.  

विरोधकांची मागणी फेटाळली
- विरोधकांनी बजेट सेशनपूर्वी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी केली होती. पण सरकारने ती मागणी मान्य केली नाही. त्यामुळे सरकारला विरोधकांच्या रागाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. 
- विरोधक रामजस कॉलेजमधील वादाबाबतही आक्रमक होण्याची शक्यता आहे. 
- या सत्रात जीएसटी विधेयक संमत व्हावे यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. 
- मीडिया रिपोर्ट्सनुसार जीएसटी विधेयक 22 मार्चचा मंत्रिमंडळासमोर सादर केले जाईल. 
- 27 मार्चला जीएसटी बिल लोकसभेत सादर केले जाईल. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...