आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारची ‘स्मृती’ परतली, जावडेकरांना बढती, वाचा कुणाला कोणती मंत्रीपदे मिळाली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - हा चूकभूल दुुरुस्तीचा विस्तार आहे. सरकारची स्मृती (येथे स्मरणशक्ती असे वाचावे) अखेर परत आली आहे. विस्तार म्हणा की फेरबदल, वादांपासून पाठ सोडवण्याचा मोठा प्रयत्न केला आहे. दोन वर्षांपासून चर्चेत राहिलेल्या स्मृती इराणींकडून मनुष्यबळ विकास मंत्रालय काढून त्यांना वस्त्रोद्योग मंत्रालय दिले. बढती मिळालेले प्रकाश जावडेकर आता मनुष्यबळ विकास मंत्रालय पाहतील. दुसरीकडे उत्तर प्रदेशातील निवडणुकीपूर्वी दलित, मागासवर्गीय व अल्पसंख्याकांची सहानुभूती मिळवण्यासाठी डाव टाकला आहे. या वर्गाला ११ मंत्रिपदे दिली आहेत.
समान नागरी कायद्याला हवा देणारे सदानंद गौडा यांच्याकडून कायदा मंत्रालय काढले. एम. जे. अकबरांना राज्यमंत्री करून प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. एकूणच ‘मिनिमम गव्हर्नमेंट, मॅक्झिमम गव्हर्नन्स’चा दावा करणाऱ्या मोदींच्या सरकारमध्ये ७८ मंत्री झाले. यूपीएचे ७७ मंत्री होते.

मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार
२६ मे २०१४ : सरकार स्थापल्यानंतर मोदी मंत्रिमंडळात ४५ मंत्री होते. म्हणजे एनडीएच्या (सध्या ३३६ खासदार) १३% खासदारांना मंत्री केले गेले.
९ नोव्हंेबर २०१५ : पहिला फेरबदल, मंत्र्यांचा आकडा ६६ वर गेला. १९ मंत्री वाढवले गेले. म्हणजे एनडीएचे २०% खासदार मंत्री बनवण्यात आले.
५ जुलै २०१६ : दुसरा फेरबदल, मंत्र्यांची संख्या ७८ झाली. आता एनडीएचे २४% खासदार मंत्री आहेत. (नियमानुसार मंत्रिमंडळात जास्तीत जास्त ८२ मंत्री असू शकतात. म्हणजे लोकसभा सदस्यांच्या १५ टक्क्यांपर्यंतच.)
पुढे वाचा,मोदीलिंपिक-२०१६ मधील मैदानात आलेल्या, राहिलेल्या अन् सोडलेल्यांचे रिपोर्ट कार्ड... २ वर्षांत २० वादांमुळे कमी झाली स्मृती...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...