आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ऐ दिल है मुश्किल’साठी रणबीर कपूरने विदेशी कंपन्यांकडून 6.75 कोटी घेतले, कॅगचा अहवाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नियंत्रक व महालेखापरीक्षक (सीएजी) अर्थात कॅगचा एक अहवाल शुक्रवारी संसदेत सादर करण्यात आला. यामध्ये सोहेल खान प्रॉडक्शन्स, सलमान खान व्हेंचर, अरबाज खान प्रॉडक्शन, शाहरुख खानची रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनचा उल्लेख आहे. एंटरटेनमेंट इंडस्ट्रीशी संबंधित या अहवालानुसार कर चुकवण्यासाठी या सर्वांनी चुकीच्या पद्धतीचा अवलंब केला आहे. नॉन थिएट्रिकल राइट्सना थिएट्रिकल म्हटले आहे. विदेशातील शूटिंगसाठीचे पैसे विदेशातील कंपनीकडून देण्यात आले, नंतर त्याला निर्यात दाखवून कर भरला नाही. कर, व्याज किंवा सेस भरण्यात न अालेली व नियम तोडण्याची अशी १५६ प्रकरणे समोर आली आहेत. स्पॉन्सरशिप सेवेमध्येही चुकीच्या पद्धतीने सेन व्हॅट क्रेडिट घेण्यात आले. एकूण ४८.१३ कोटी रुपयांचे कर क्रेडिट चुकीच्या पद्धतीने घेण्यात आले आहे. कर विभागाच्या पातळीवर रिटर्न फायलिंगचे नियंत्रण, रिटर्नची स्क्रुटिनी, कारणे दाखवा नोटीस या प्रक्रियेतच त्रुटी असल्याचे समोर आले आहे.  
 
२०१२ - १३ ते २०१४-१५ दरम्यान डिस्ट्रिब्युटरांनी ५०.५६ कोटी रुपये कमावले. मात्र, त्याला थिएट्रिकल राइट दाखवून त्यांनी ६.२१ कोटी रुपयांचा कर भरला नसल्याचे अहवालात म्हटले आहे. विशेष म्हणजे कॅगच्या अहवालात ताशेरे ओढण्यात आल्यानंतरही डिस्ट्रिब्युशन आणि पब्लिसिटी खर्च थिएट्रिकल राइट्सचाच भाग असल्याचे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. मंत्रालयाच्या या दाव्याला कॅगने नकार दिला आहे. तसेच कायदा अधिक स्पष्ट करण्याचाही सल्ला दिला आहे.
 
नियम तोडून कर न भरल्याची तीन वर्षांत १५६ प्रकरणे आली समोर...  
 
वार्षिक व्यवसाय कमी दाखवून सेवा करात नोंदणीच केली नाही  
कॅगचा अहवाल २०१३-१४ ते २०१५-१६ चा आहे. या अहवालानुसार, सेवा कराच्या डेटाला प्राप्तिकर विभागाच्या व कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या डेटाशी क्रॉसचेक करण्यात घोटाळे असल्याचे समोर येत आहे. एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये वार्षिक उत्पन्न १० लाख रुपयांपेक्षा जास्त असणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. असे असले तरी त्यांची सेवा करात नोंदणीदेखील झालेली नाही. कायद्यानुसार १० लाख रुपयांपर्यंत टर्नओव्हर असलेल्या कंपन्यांनाच सूट आहे. त्यामुळे जास्त व्यवसाय असल्यास सेवा कर विभागात नोंदणी करणे अनिवार्य आहे. 
 
करपात्र सेवेला विनाकरपात्र दाखवण्यात अाले  
- थिएट्रिकल राइट्सवर कर नाही, मात्र नॉन-थिएट्रिकल राइट्सवर कर लागतो. पूर्ण महसूल थिएट्रिकल राइट्स दाखवून कर भरण्यापासून वाचण्यात अाले.  
- इरॉस इंटरनॅशनल मीडियाच्या दस्तऐवजाच्या तपासातून सोहेल खान प्रॉडक्शन आणि सलमान खान व्हेंचर प्रा. लि.च्या सोबत अॅग्रीमेंटमध्ये थिएट्रिकल आणि नॉन-थिएट्रिकल राइट्स दोन्ही कंपोनंट होते. मात्र, पूर्ण उत्पन्न थिएट्रिकल राइट्समध्ये दाखवून त्यावर सेवा करात सूट देण्यासाठी क्लेम करण्यात आला.  
- आक्षेप घेतल्यानंतर अॅग्रीमेंटमध्ये टायपिंगच्या चुका असल्याचे उत्तर कर विभागाने दिले. वास्तवात त्यामध्ये केवळ थिएट्रिकल राइट्स आहेत. कॅगने हे उत्तर मान्य केले नाही. विभागाने टायपिंगच्या चुकीचा पुरावा दिला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.  
 
कॉपीराइटला चुकीच्या पद्धतीने स्थायी हस्तांतरण दाखवले  
- कॉपीराइटमध्ये मर्यादित ट्रान्सफरवर कर लागतो, स्थायी ट्रान्सफरवर नाही. कर वाचवण्यासाठी करारात स्थायी ट्रान्सफर दाखवले, मात्र अधिकार मर्यादेत दिले.
- अरबाज खान प्रॉडक्शन्स आणि रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या कागदपत्राच्या तपासात समजले की, ‘चेन्नई एक्स्प्रेस’ आणि ‘दबंग ३’ चित्रपटाच्या म्युझिक आणि साउंड रेकाॅर्डिंग राइट्स सुपर कॅसेट इंडस्ट्रीला स्थायी स्वरूपात देण्यात आले. मात्र, यामध्ये काही अटीदेखील लावण्यात आल्या. त्यामुळे हा करार स्थायी ठरत नाही.  
 - कर विभागाच्या उत्तरानुसार करारातील अटींमुळे कराराची प्रकृती बदलत नाही. त्यामुळे यावर कर लागत नाही. कॅगने हे उत्तर मान्य केले नाही. यासाठी कॅगने सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा हवाला दिला.  
 
पुढील स्लाइडवर वाचा, सेवेला निर्यात दाखवून कर भरण्यात आला नाही...  
बातम्या आणखी आहेत...