आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॅन्सर, हृदय, त्वचारोग व मधुमेहासाठीच्या 51 औषधांच्या किमती निश्चित;औषधी झाल्या स्वस्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सरकारने कॅन्सर, हृदयरोग, मधुमेह, वेदना आणि त्वचारोगासंबंधी ५१ औषधांचे कमाल विक्रीमूल्य निश्चित केले. यात अशा औषधांच्या किमती ६% ते ५३% उतरतील. देशात औषधांच्या किमती नियंत्रित करणाऱ्या नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग अॅथॉरिटीने (एनपीपीए) १३ औषधांचे कमाल िवक्रीमूल्य निश्चित केले आणि १५ औषधांच्या किमतीत दुरुस्ती केली. याशिवाय २३ अत्यावश्यक औषधांचे किरकोळ बाजारातील मूल्यही ठरवून दिले. 

 

ज्या कंपन्यांच्या औषधांच्या किमती निश्चित केलेल्या किमतीपेक्षा अधिक आहेत त्यांनी तत्काळ उपाययोजना कराव्यात, असेही एनपीपीएने कळवले आहे. ज्या औषधांच्या किमती ठरवलेल्या किमतींपेक्षा कमी आहेत त्या किमती वाढवू शकणार नाहीत. नव्या किमतींवर जीएसटी पण लागू होईल.  ज्या औषधांच्या किमती निश्चित करण्यात आल्या त्यात कॅन्सरवरील ऑक्सालिप्लेटिन, जपानी ताप आणि मीझल्स रुबेला लसीचा समावेश आहे. अॅनेस्थेटिक सेव्होफ्लुरेन, फायटोमेनाडाइन (व्हिटामिन के-१) आणि बीसीजी लसीची किंमत कमी करण्यात आली आहे. सरकारने अत्यावश्यक औषधांची राष्ट्रीय यादी केलेली असून यात नवीन औषधी जोडल्या जातात. सध्या अशी ८०० औषधे यादीत अाहेत. याच्या किमती ठरवण्याचा अधिकार एनपीपीएला आहे.

५१ औषधींच्या किमती ६% ते ५३% स्वस्त होणार, यापैकी काही औषधी अशा...

 

> मॉर्फिन (३० एमजी-१० गोळ्या)
उपयोग : असह्य वेदना कमी करणे, हृदयाघातावेळीही दिली जाते.  
आधीची किंमत : ५५-१६५रुपये
नवी किंमत : ४९.४० रुपये
 
> अॅल्टिप्लेझ (२० एमजी)
उपयोग : रक्तगाठी होऊ न देणे. 
आधीची किंमत  : १९,८००-२२,०००
नवी किंमत : १७,२३५ रुपये
 
> गाडोबिनेट (इंजेक्शन ५२९ एमजी)
उपयोग : अँजिअोग्राफीसाठी वापर. 
आधीची किंमत: १२५-१५० रुपयांपर्यंत 
नवी किंमत: ९८.९० रुपये
 
> कॅगुलेशन फॅक्टर ९
(इंजेक्शन ६०० आययू)
उपयोग : हिमोफिलियाच्या रुग्णांसाठी
आधीची किंमत : १३ हजार रुपये
नवी किंमत : ११,१८० रुपये
 
> पिलोकार्पाइन (१ मिली, थेंब)
उपयोग : डोळ्यासाठी वापरले जाणारे ड्रॉप, ग्लायकोमासाठी उपयुक्त. 
आधीची किंमत : १५-३० रुपये
नवी किंमत : १०.६० रुपये
 
> सेवोफ्ल्युरेन (इन्हेलर)
उपयोग : सामान्य अॅनेस्थेशियात वापर. 
आधीची किंमत : ३०-४५ रुपये
नवी किंमत : २४.१२ रुपये
 
> अँटी-डी इम्युनोग्लोब्युलिन (इंजेक्शन, ३़़़़०० मिलिग्रॅम)
उपयोग : गर्भधारणेच्या काळात महिलांमध्ये निर्माण होणारा प्रथिनांचा अभाव टाळण्यासाठी या औषधीचा प्राधान्याने वापर केला जातो. 
आधीची किंमत : २,५००-२,७०० रुपये.
नवी किंमत : १,९३६.८२ रुपये

 

> सरफॅक्टंट (सस्पेन्शन)
उपयोग : गर्भात बाळाच्या पोटात घाण पाणी गेल्याने होणारा संसर्ग टाळण्यासाठी. 
आधीची किंमत : ८०-१०० रुपये
नवी किंमत : ६०.६९ रुपये


> ऑक्सालिप्लेटिन (इंजे. ५० एमजी)
उपयोग : किमोथेरपीत याचा वापर होतो. 
आधीची किंमत : १,७४०- ४,९३८ रु. 
नवी किंमत: २,३०३ रुपये


> व्होग्लीबोस+मेटफॉर्मिन+ग्लाइमपिरिड (०.२ +५००+१ एमजी, १५ गोळ्यांचा पॅक)
उपयोग: मधुमेहाची औषधी
आधीची किंमत : १६१ रुपये
नवी किंमत : १०७.१० रुपये


> व्होग्लीबोस+ मेटफॉर्मिन (०.२+५०० एमजी, १० गोळ्या)
उपयोग : मधुमेहाची औषधी
आधीची किंमत : १०६ रुपये
नवी किंमत : ४८.४० रुपये


> व्होग्लीबोस+ मेटफॉर्मिन (०.३+५०० एमजी, १० गोळ्या)
उपयोग : मधुमेहाची औषधी
आधीची किंमत : १२५ रुपये
नवी किंमत : ५७.६० रुपये.

 

एनपीपीए  कशा ठरवते किमती

एखाद्या आजारासाठी १% पेक्षा अधिक बाजाराचा वाटा असलेल्या सर्व औषधींच्या किमतीची सरासरी काढली जाते. तेच कमाल मूल्य. 

बातम्या आणखी आहेत...